Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, शहरात तब्बल २९१ ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्याच्या, तर २२ ठिकाणी भिंती अथवा घरांचे भाग कोसळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. (Mumbai Rain)


हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील तास मुंबई शहर आणि उपनगरात संततधार पाऊस कायम राहणार असून काही भागांत जोरदार ते अति जोरदार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे. (Mumbai Rain)



महापालिकेच्या अहवालानुसार, मागील २४ तासांत कुलाबा येथे १२८ मिमी, तर सांताक्रूझ येथे १५९.२ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे ३९.२ मिमी, तर सांताक्रूझ येथे ६९.६ मिमी पाऊस झाला. महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांनुसार शहरात २८.२ मिमी, पूर्व उपनगरात ६१.७५ मिमी आणि पश्चिम उपनगरात ६५.४५ मिमी पावसाची नोंद झाली. (Mumbai Rain)


मुसळधार पावसामुळे शहरात ७४, पूर्व उपनगरात ७८ आणि पश्चिम उपनगरात १३९ अशा एकूण २९१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच १२ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना, तर २२ ठिकाणी भिंती किंवा घरांचे भाग कोसळल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संबंधित विभागांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. (Mumbai Rain)



दरम्यान, पावसाचा जोर असूनही मुंबईतील रस्ते वाहतूक तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. मात्र, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Rain)

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर