Ahilyanagar : भंडारदऱ्यात निसर्गाचा हाहाकार ! 24 तासांत 300 मिमी पाऊस; प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद

Ahilyanagar Rain : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाचा तांडव पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्या, धरणे दुथडी भरून वाहत आहे. नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरात गेल्या 24 तासांत तब्बल 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी पावसाचा तांडव पहायला मिळत आहे.


घाटघर आणि रतनवाडी परिसरातील अतिवृष्टीमुळे या दुर्गम आदिवासी भागातील (Tribal Area) जनजीवन पूर्णपणे प्रभावित (Disrupted) झाले आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील घाटघर (Ghatghar) आणि रतनवाडी (Ratanwadi) परिसरात ढगफुटीसदृश (Cloudburst) पाऊस झाल्याने स्थानिक नदी-नाल्यांना पूर आला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून (Administration) चोख खबरदारी घेतली जात आहे.



धोकादायक पर्यटनस्थळे बंद


पावसाचा वाढता जोर पाहता तसेच संभाव्य धोखा लक्षात घेता भंडारदरा धरण परिसरातील सर्व धोकादायक पर्यटनस्थळे (Tourist Spots) तात्काळ बंद करण्यात आली आहेत. कळसूबाई शिखर (Kalsubai Peak) , ट्रेकर्सचे नंदनवन मानली जाणारी सांदन व्हॅली (Sandhan Valley), रतनवाडी (Ratanwadi) आणि परिसरातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच, ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांच्या खाली जाण्यास प्रशासनाने पर्यटकांना सक्त मनाई केली आहे.



ढगफुटीसदृश पावसाचे मोठे संकट टळले


दुसरीकडे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरावर घोंगावणारे ढगफुटीसदृश (Cloudburst) पावसाचे मोठे संकट तूर्तास टळले आहे. नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचा हाय अलर्ट (High alert) जारी करण्यात आला होता. मंगळवारी पहाटेपर्यंत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहर परिसरात काही काळ विश्रांती घेतली असली तरी त्र्यंबकेश्वर,आणि इगतपुरी या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे.


धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर (Ahilyanagar) आणि गुजरातच्या सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले आहेत. त्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचा (Cloudburst) धोका आता टळला आहे. दरम्यान, नाशिक, इगतपुरी त्रंबकेश्वर भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि