Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 10.65 कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त; एका परदेशी व्यक्तीला अटक

मुंबई : अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध केलेल्या एका मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई विभागीय पथकाने, फ्रीटाउनहून नैरोबीमार्गे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) आलेल्या एका महिला प्रवाशाकडून 2.128 किलोग्राम कोकेन जप्त केले. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 10.65 कोटी रुपये इतकी आहे.



प्राप्त झालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी रविवारी (5 जुलै, 2026) एका महिला प्रवाशाला हटकले. या प्रवाशाच्या सामानाची एक्स-रे मशीनद्वारे तपासणी केली असता, तिच्या ट्रॉली बॅग्सच्या धातूच्या हँडल्समध्ये काहीतरी लपवल्याचे आढळून आले. त्यानंतर, त्या बॅग्समधील धातूचे हँडल्स काढून तपासले असता, त्यातून दंडगोलाकार आकाराची 17 पाकिटे सापडली. या पाकिटांमध्ये पांढऱ्या रंगाच्या पावडरसारखा पदार्थ आढळून आला; चाचणी उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणात तो पदार्थ 'कोकेन' असल्याचे निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात 10.65 कोटी रुपये मूल्य असलेले एकूण 2128 ग्रॅम (निव्वळ वजन) कोकेन यावेळी जप्त करण्यात आले.



जप्त करण्यात आलेला हा प्रतिबंधित माल अंमलीपदार्थ आणि मनोव्यापारिक औषधे (NDPS) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीमागील व्यापक जाळे शोधून काढण्याच्या उद्देशाने पुढील तपास सुरू आहे.'नशा मुक्त भारत' घडवण्याच्या आपल्या संकल्पावर ठाम राहत अंमली पदार्थ जप्त करणे, आंतरराष्ट्रीय तस्करी टोळ्यांचा बिमोड करणे आणि देशाचे आरोग्य, कल्याण आणि सुरक्षा यांचे संरक्षण करणे यांसाठी महसूल गुप्तचर संचालनालय अविरत प्रयत्न करीत आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला