France Bomb Blast : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यादरम्यान दमास्कसमध्ये स्फोट; सुरक्षेची चिंता वाढली

दमास्कस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या सीरियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यानच सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये जोरदार स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटांमध्ये किती जीवित किंवा वित्तहानी झाली आहे, तसेच त्यामागे नेमके कोण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यावेळी झालेल्या या स्फोटांमुळे त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, मॅक्रॉन यांचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे की ते पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचा सीरिया दौरा नियोजित कार्यक्रमानुसार सुरू राहणार आहे. (France Bomb Blast)


मंगळवारी दमास्कसमध्ये झालेल्या दोन भीषण स्फोटांमुळे शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शरा यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठकीसाठी राष्ट्रपती भवनात उपस्थित होते. राष्ट्रपती भवनातील बैठकीदरम्यान दमास्कसमधील फोर सीझन्स हॉटेलजवळ हे स्फोट झाले. मात्र, या घटनेबाबत सीरियन अधिकाऱ्यांनी तत्काळ कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही. (France Bomb Blast)



सीरियन माध्यमांच्या वृत्तानुसार, मॅक्रॉन हे दमास्कस दौऱ्यादरम्यान फोर सीझन्स हॉटेलमध्येच मुक्कामी आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने त्यांची सुरक्षितता असल्याची पुष्टी केली असून त्यांचा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे सांगितले आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, दमास्कसच्या मध्यवर्ती भागात झालेल्या दोन्ही स्फोटांसाठी स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आला होता. स्फोटानंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये एक वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले दिसत असून रस्त्यावर रक्ताचे डागही स्पष्टपणे दिसत आहेत. (France Bomb Blast)



या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच, कोणत्याही संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीही दमास्कसमधील न्यायालयीन संकुलाजवळ (जस्टिस पॅलेस) असलेल्या एका कॅफेमध्ये स्फोट झाला होता. त्या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला होता, तर अन्य २० जण जखमी झाले होते. (France Bomb Blast)




Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.