Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.


दरेकर यांनी दिलेल्या निवेदनात दापोली, पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडणारा हा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असल्याचे नमूद केले आहे. सध्या या मार्गावरील आंबेनळी घाटात मुसळधार पावसाच्या काळात दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, असे त्यांनी सांगितले.



राज्य सरकारकडून घाट परिसरात रस्ता रुंदीकरण, संरक्षण भिंती आणि इतर उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अतिवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.


दरेकर यांच्या मते, नवीन राष्ट्रीय महामार्ग (National Highway) उभारण्यात आल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क अधिक सुरक्षित आणि जलद होईल. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना कोकणात ये-जा करणे सोपे होईल.



या मार्गामुळे महाबळेश्वर आणि कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. याशिवाय आंबा, काजू आणि इतर कृषी उत्पादनांची वाहतूक अधिक वेगाने होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असे दरेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. (Maharashtra News)


या प्रस्तावासाठी आवश्यक मंजुरी आणि आर्थिक तरतूद करण्याची विनंती त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली. यावर नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.


Comments
Add Comment

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.