Ashish Shelar : रिफायनरी किंवा अणुऊर्जा प्रकल्प कातळशिल्पांच्या आड येणार नाहीत!

- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; 'एआय'च्या माध्यमातून इतिहासपूर्व जीवनशैलीची पुनर्निर्मिती


मुंबई : मानवी उत्क्रांतीच्या आणि इतिहासपूर्व काळाच्या इतिहासाचे अत्यंत महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील ऐतिहासिक कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्पांसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांचे नियोजन केले जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. भारतीय पुरातत्त्व खाते आणि राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोकणात अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प होणार नाही आणि या ऐतिहासिक वारशाला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे स्पष्ट करतानाच, कातळशिल्पांच्या परिसराचा विकास व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.



विधानसभेत आमदार विठ्ठल लंघे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे कोकणातील कातळशिल्पांच्या दुरवस्थेचा आणि विकास प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, विक्रांत पाचपुते आणि नाना पटोले यांनी सहभाग घेत कातळशिल्पांच्या जतनासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री शेलार म्हणाले की, कोकणातील रत्नागिरी विभागातील सुमारे ३०० किलोमीटर लांब आणि २५ किलोमीटर रुंद क्षेत्रामध्ये २ हजारपेक्षा जास्त कातळशिल्पे आणि १५० हून अधिक कातळशिल्प स्थळे सापडली आहेत. या अमूल्य वारशाचे सूक्ष्मदृष्टीने आणि सर्व ऋतूंमध्ये दृकश्राव्य चित्रीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ८ एप्रिल २०२६ रोजीच्या शासननिर्णयान्वये, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट बनवण्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हा निधी उपलब्ध झाला आहे. (Ashish Shelar)


आंतरराष्ट्रीय बाजाराचे सर्वेक्षण करून या माहितीपटाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला ४५ मिनिटांचा एक उच्च दर्जाचा सिनेमॅटिक माहितीपट तयार केला जाईल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून इतिहासपूर्व काळातील मानवी जीवनशैलीची दृश्य स्वरूपात पुनर्निर्मिती केली जाणार आहे. यासोबतच, युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट असलेल्या ९ स्थळांवर व त्यांच्या बफर क्षेत्रातील स्थळांवर स्वतंत्र ८ मिनिटांचे लघु माहितीपट आणि या संपूर्ण प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करणारा एक 'बिहाईंड द सीन्स' माहितीपटही बनवला जाईल. (Ashish Shelar)



डिजिटल प्रसारासाठी 'कंटेंट बँक' :


या चित्रीकरणाचे सर्व रॉ फुटेज, ड्रोनद्वारे केलेले हवाई चित्रीकरण आणि उच्च दर्जाची छायाचित्रे राज्य शासनाच्या संचालनालयाच्या ताब्यात राहतील. या दृकश्राव्य सामग्रीच्या आधारे समाजमाध्यमांसाठी (सोशल मीडिया) विशेष इन्फोग्राफिक्स आणि डिजिटल प्रसारासाठी आवश्यक 'कंटेंट बँक' विकसित केली जाणार आहे. कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी कातळशिल्प परिसराचा विकास आणि सेवासुविधा उपलब्ध करून देणारा कृती आराखडा तयार झाला असून, त्यानुसार संरक्षण भिंती उभारणे व अन्य कामे सुरू झाली आहेत. ही कातळशिल्पे ज्या खासगी जमीन मालकांच्या जागेत आहेत, त्यांनाही पर्यटन विकासाच्या माध्यमातून आर्थिक फायदा होईल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी नमूद केले. (Ashish Shelar)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने