Saudi Arabia : सौदी अरेबियाकडून तेलदरात २६ वर्षांतील सर्वात मोठी कपात; भारताला दिलासा

नवी दिल्ली : अमेरिका-इराण युद्ध थांबल्यानंतर आता परिस्थिती पुन्हा सामान्य होऊ लागली आहे. कच्च्या तेलाचे दर घसरून प्रति बॅरल ७२ डॉलरपर्यंत आले आहेत. दरम्यान, आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियाने ऑगस्ट महिन्यासाठी आशियाई देशांना पुरवण्यात येणाऱ्या तेलाच्या किमतीत गेल्या २६ वर्षांतील सर्वात मोठी कपात जाहीर केली आहे.कच्च्या तेलाच्या किमतीतील ही कपात भारतासाठी मोठा दिलासा मानली जात आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोने ऑगस्टपासून आशियासाठी कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल १.१ डॉलरची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अरब लाइट क्रूड हे प्रादेशिक बेंचमार्कच्या तुलनेत प्रति बॅरल १.५० डॉलर सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा सौदी अरेबियाकडून आयात करतो. त्यामुळे ही बातमी भारतीय तेल कंपन्यांसाठी मोठा दिलासा देणारी मानली जात आहे. मात्र, जागतिक बाजारात जूनच्या मध्यापासूनच कच्च्या तेलाच्या किमती नरम राहिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत आता घसरून सुमारे ७२ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे, जी यावर्षी फेब्रुवारी अखेरीस असलेल्या पातळीच्या जवळपास आहे.



अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. युद्धामुळे ही वाहतूक काही काळ बंद होती. होर्मुझ सामुद्रधुनी खु inली झाल्यानंतर सौदी अरामकोने रास तनुरा बंदर येथून कच्च्या तेलाच्या निर्यातीचा वेग वाढवून तो युद्धापूर्वीच्या पातळीच्या सुमारे ९० टक्क्यांपर्यंत नेला आहे.होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे कंपनीला आपला माल लाल समुद्रातील यानबू बंदर मार्गे पाठवावा लागत होता. त्यामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता तेलाचा पुरवठा पूर्ववत झाल्याने स्वस्त तेलाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. याशिवाय, सौदी अरेबिया आणि रशियाच्या नेतृत्वाखालील ओपेक प्लस गटाने ऑगस्ट महिन्यासाठी तेल उत्पादन कोट्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सौदी अरेबिया, इराक आणि कुवेत यांसारखे देश आपल्या वाढीव उत्पादन कोट्याचा पूर्ण वापर करून अधिक प्रमाणात तेल बाजारात आणत आहेत.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी