Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मुसळधार ! भंडारदरा निम्मे भरले तर मुळा नदीला पूर

Ahilyanagar :गर जिल्ह्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील भंडारदरा धरण निम्मे भरले आहे. भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव सुरू असल्याने धरणात वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे. 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण काल सायंकाळी 5 वाजता निम्मे झाले. काल सायंकाळी पाणीसाठा 5604 दलघफू (50.76 टक्के) झाला होता. वाकीचा ओव्हरफ्लो वाढला असून निळवंडेतही आवक वाढल्याने हे धरण 25 टक्क्यांवर गेले आहे.



मुळा नदीला पूर


सोबतच अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण (Mula Dam) पाणलोटातील अकोलेतील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात अतिवृष्टी होत असल्याने काल दुपारपासून अकोलेतील मुळा नदीला पूर वाढला आहे. सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग केवळ 13836 क्युसेक होता. पण धो धो पाऊस कोसळत असल्याने क्षणाक्षणाला मुळाचा विसर्ग वाढत होता. दुपारी 12 वाजता हा विसर्ग 29533 क्युसेक होता. त्यानंतर दुपारी 3 वाजता हा विसर्ग 37875 क्युसेकवर पोहचला होता.



शेती जलमय, प्रचंड नुकसान


मुळा नदीला पूर आल्याने मुळा धरणात विक्रमी आवक होत आहे. उद्याही आजच्यापेक्षा अधिक आवक होणार आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे. दरम्यान, पुरामुळे लहीत खुर्द-लहीत बुद्रुक जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून दोन्ही गावांमधील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. पुराचे पाणी कोतूळ येथील कोतूळेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. तसेच शेती जलमय झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे.


तर नाशिकमध्येही मुसळधार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणची नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक धरणांमधून आता विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhmeshwar) बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात (Godavari River) १५ हजार २४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता याच निसर्गाच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.



विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता


सुरुवातीला नांदूर मध्यमेश्वर (Nandur Madhmeshwar) बंधाऱ्यामधुन 18403 क्युसेक्स ने विसर्ग चालू होता तरी तो विसर्ग दुपारी 2 वाजता 10531 क्युसेक्स ने वाढ करून एकूण 28934 क्यूसेक्स करण्यात आला आहे.सदर विसर्गात टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे. तरी प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Ashok Kharat Case : मोठी अपडेट ! भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, सरकार पक्षातर्फे उज्ज्वल निकम बाजू मांडणार

Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

Delhi Gang Rape : धक्कादायक! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चालक आणि वाहकाला अटक

नवी दिल्ली : दिल्लीच्या काश्मिरी गेट परिसरात स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची