Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत मंत्री नितेश राणेंचे कौतुक

वॉटर मेट्रोसाठी प्रभावी काम; ३४० किमी वॉटर मेट्रोमार्गांचे जाळे उभारणार



मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून उभारण्यात येत असलेल्या 'मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी'मध्ये वॉटर मेट्रो हा गेमचेंजर ठरणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत प्रभावी आणि कौतुकास्पद काम केले आहे, अशा गौरवपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या जलवाहतुकीचा आराखड्यावर भाष्य केले. ६ हजार ६६ कोटी रुपयांच्या या प्रस्तावात ३३ मार्ग आणि ४४ टर्मिनल्ससह तब्बल ३४० किलोमीटर लांबीचे वॉटर मेट्रोचे जाळे उभारण्यात येत असून, हे काम पूर्ण झाल्यावर ही जगातील सर्वात मोठी जलवाहतूक प्रणाली ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी सभागृहात व्यक्त केला.



मुंबईतील वाहतुकीचे एकात्मिकरण (Multimodal Connectivity) करताना जलवाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे. या संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला. मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबईच्या मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीमध्ये आपण जी वॉटर मेट्रो तयार करतो आहोत, त्यामध्ये आमच्या नितेश राणेंनी खूप चांगल्या पद्धतीने आणि कौतुकास्पद काम केले आहे. या प्रकल्पांतर्गत २०३ पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वेसल्स (जलवाहने) खरेदी केली जाणार असून, २०३१ पर्यंत ७.५ कोटी प्रवासी याद्वारे प्रवास करतील, असे नियोजन करण्यात आले आहे. या महाकाय प्रकल्पाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे काम युद्धपातळीवर सुरू असून वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) 'पॉड टॅक्सी' देखील सुरू करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण