Nashik : रामकुंड पूरस्थितीची पाहणी करून मंत्री गिरीश महाजन तातडीने पुण्याकडे रवाना; मोशी दुर्घटनेतील बचावकार्याचा घेणार आढावा

Nashik : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून रामकुंड (Ramkund) परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी बुधवारी सकाळी रामकुंड परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. मात्र, पाहणी सुरू असतानाच पुण्यातील मोशी येथे इमारत कोसळल्याची गंभीर घटना समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पुण्याकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला.




रामकुंड परिसरात पाहणी


रामकुंड परिसरातील पाहणीदरम्यान मंत्री महाजन (Minister Girish Mahajan) यांनी नदीपात्रातील पाण्याची वाढती पातळी, पूरनियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेली यंत्रणा तसेच आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची तयारी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पूरस्थिती लक्षात घेता कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.




प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या प्रशासनाला सूचना


यावेळी नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले. तसेच नदीकाठच्या भागांवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.


या पाहणीवेळी महापालिका आयुक्त मनिषा खत्री (Manisha Khatri) , पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik), लोकप्रतिनिधी तसेच महापालिका, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.




मंत्री महाजन तातडीने पुण्याकडे रवाना


दरम्यान, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान मोशी येथील कचरा डेपो शेजारी असलेली एक इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा इमारतीवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून ढिगाऱ्याखाली सुमारे १४ ते १५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पाहणी आटोपताच तातडीने पुण्याकडे रवाना होत मोशी दुर्घटनास्थळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ते घटनास्थळी सुरू असलेल्या शोध, बचाव आणि मदतकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेणार असून संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देणार आहेत.




ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पथके, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच इतर बचाव यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. युद्धपातळीवर शोध व बचावमोहीम सुरू असून ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत, याबाबत अधिकृत माहिती बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.


गेल्या काही तासांपासून पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून प्रमुख रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण