Argentina vs Egypt World Cup match: वादाच्या भोवऱ्यात रेफरी फ्रान्स्वा लेटेक्सियर; फिफाकडे इजिप्तची अधिकृत तक्रार

दोहा: मंगळवारी झालेल्या फिफा विश्वचषकातील अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त सामन्यात पंचांच्या काही वादग्रस्त निर्णयांनी मोठा गदारोळ निर्माण केला आहे. या सामन्याचे मुख्य रेफरी फ्रान्स्वा लेटेक्सियर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, इजिप्त फुटबॉल असोसिएशनने (EFF) फिफाकडे औपचारिक निषेध नोंदवला आहे.



नक्की काय घडले?


सामन्यात इजिप्तने २-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, सामन्याच्या ७९ व्या मिनिटापासून अर्जेंटिनाने लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली जोरदार पुनरागमन केले. मेस्सीने एक गोल आणि एका असिस्टसह सामन्याचे पारडे फिरवले, तर एन्झो फर्नांडिसने अतिरिक्त वेळेत गोल करत अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला.


इजिप्तचा संघ मात्र या पराभवापेक्षा पंचांच्या काही निर्णयांवर अधिक संतप्त आहे. यात प्रामुख्याने VAR पुनरावलोकनानंतर रद्द झालेला इजिप्तचा गोल आणि अर्जेंटिनाच्या निर्णायक गोलच्या आधी न तपासलेले पेनल्टी अपील यांचा समावेश आहे. या निर्णयांमुळे सामन्याचा निकाल प्रभावित झाल्याचा दावा इजिप्तकडून करण्यात आला आहे.



इजिप्तची मागणी आणि फिफाची भूमिका


इजिप्त फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष हानी अबो रिदा यांनी यासंदर्भात फिफाकडे लेखी तक्रार केली आहे. पंचांनी केलेल्या कथित चुका पाहता, रेफरी फ्रान्स्वा लेटेक्सियर आणि त्यांच्या पथकाला उर्वरित स्पर्धेतून काढून टाकण्याची मागणी महासंघाने केली आहे.


'ल'इक्विप'च्या वृत्तानुसार, फिफा आता या संपूर्ण प्रकरणाचे तांत्रिक पुनरावलोकन करणार आहे. यामध्ये पंचांचा अहवाल, व्हिडिओ फुटेज आणि तांत्रिक कामगिरी तपासली जाणार आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार ही तक्रार यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. नियमांनुसार, कोणताही देश पंचांच्या नियुक्तीवर नकाराधिकार (Veto) वापरू शकत नाही, कारण हे अधिकार पूर्णपणे 'फिफा पंच समिती'च्या अखत्यारीत येतात.



इतिहासाची पुनरावृत्ती?


विश्वचषकाच्या इतिहासात अशा तक्रारी नवीन नाहीत. यापूर्वी २००२ मध्ये इटलीने इक्वेडोरचे पंच बायरन मोरेनो यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर मोरेनो यांना त्या स्पर्धेत पुन्हा पंचगिरी करण्याची संधी मिळाली नव्हती, मात्र तो निर्णय इटलीच्या तक्रारीमुळेच झाला होता, हे फिफाने कधीही स्पष्ट केले नाही.


उल्लेखनीय म्हणजे, फ्रान्स्वा लेटेक्सियर यांनी युरो २०२४ च्या अंतिम सामन्यात (स्पेन विरुद्ध इंग्लंड) पंच म्हणून काम पाहिले होते, तसेच त्यांना 'आयएफएफएचएस'तर्फे जगातील सर्वोत्तम रेफरी म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यामुळे आता फिफा या प्रकरणी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Manisha Bhanwala : 'दंगल गर्ल' मनीषा भानवालाने रचला इतिहास; जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

Manisha Bhanwala : भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे.

आयपीएल 2027 स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित पर्व! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर परतण्याची तयारी, झालं असं..

आयपीएल स्पर्धेत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या काही वर्षात निराशाजनक राहिली

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव कुठे झाला? कर्णधार श्रेयस अय्यरने असं फोडलं खापर

भारताने सलग तीन सामन्यात न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे चौथ्या टी20 सामन्यात

मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक गटात मोठे बदल; पोलार्डच्या नेतृत्वाखाली दिग्गज खेळाडूंची नवीन इनिंग सुरू

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक गटात मोठे आणि आश्चर्यकारक

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात ऑकलंडचा इतिहास बदलला, भारताचा 87 धावांनी पराभव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल

World Record: T20 मध्ये नवा इतिहास, दिग्गज गोलंदाजही मागे; राशिद खानचा क्रिकेट विश्वात नवा विक्रम

[caption id="attachment_1070550" align="aligncenter" width="800"] अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा