Chakur Bus Accident : चाकूरमध्ये शाळेची बस पलटून २२ विद्यार्थी जखमी प्रकरणी चालकासह मुख्याध्यापक व संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर : जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन २२ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली या प्रकरणात बस चालकाच्या निष्काळजीपणाबरोबरच शालेय बस नियमांचे पालन करण्यात झालेल्या त्रुटींची दखल घेत चाकूर पोलिसांनी बस चालकासह संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Chakur Bus Accident)


बुधवार ८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास सांडोळ मोड, ता. चाकूर येथे शाळेची बस (क्र. MH-12-PQ-5120) विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना चालकाने वाहन हायगयीने व निष्काळजीपणे चालविल्याने बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात बसमधील २२ विद्यार्थ्यांना किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Chakur Bus Accident)



या घटनेप्रकरणी फिर्यादी माधव नारायण देशपांडे (रा. सांडोळ, ता. चाकूर) यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), २२३, ३(५) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १८४ ३(१)/१८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तपासादरम्यान बस चालकाकडे आवश्यक वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. तसेच शालेय बसच्या सुरक्षिततेसंदर्भातील नियमांचे पालन करण्यात झालेल्या गंभीर दुर्लक्षाची नोंद घेऊन बस चालकासोबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेंडगे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर, पोलीस निरीक्षक भंडे तसेच तपासी अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा व आवश्यक कार्यवाही केली. (Chakur Bus Accident)



लातूर पोलिसांचे शाळा व्यवस्थापन व संस्थाचालकांना आवाहन :


शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. त्यामुळे सर्व शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापक, वाहन कंत्राटदार व बस चालक यांनी शालेय बससंदर्भातील शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. चालकाकडे वैध परवाना, वाहनाची तांत्रिक तपासणी, आवश्यक सुरक्षा साधने व विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भातील सर्व निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, नियमभंग किंवा हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. (Chakur Bus Accident)

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी