Make in India : सावंतवाडीत इलेक्ट्रिक जहाज निर्मिती प्रकल्प

 मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; १५० कोटींची गुंतवणूक, 'मेक इन इंडिया' अंतर्गत प्रवासी बोटींची निर्मिती



मुंबई(Mumbai) : महाराष्ट्रातील हरित सागरी वाहतुकीला चालना देणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे तब्बल १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक इलेक्ट्रिक जहाज निर्मिती कारखान्याची उभारणी केली जाणार आहे. 'मेक इन इंडिया' संकल्पनेला बळ देणाऱ्या या प्रकल्पांतर्गत मुंबई वॉटर मेट्रोसाठी पर्यावरणपूरक व आधुनिक जलयानांची (वेसल्स) निर्मिती केली जाईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी दिली. मंत्रालयात त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सागरी मंडळ (MMD) आणि मे. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सागरी क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला जात आहे. त्याच धोरणाचा एक भाग म्हणून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या करारानुसार, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक, वेगवान आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी प्रवासी जलयाने वेळेत उपलब्ध करून दिली जातील. या जलयानांच्या निर्मितीसाठी आणि राज्यामध्ये जहाजबांधणी (Shipbuilding) सुविधा विकसित करण्यासाठी मे. झोया मरीन सर्व्हिसेस ही कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे सुमारे २२ एकर जागेवर आपला अत्याधुनिक कारखाना उभारणार आहे.




स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी



- या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग आणि कोकण परिसरातील सागरी अर्थव्यवस्थेला (Blue Econome) मोठे बळ मिळणार आहे. या अत्याधुनिक कारखान्यामुळे जहाजबांधणी क्षेत्रात नवीन आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्रात सुरू होईल. "मुंबई वॉटर मेट्रोसाठी अत्याधुनिक जलयाने उपलब्ध करून देण्याबरोबरच सिंधुदुर्गमध्ये १५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उद्योग सुरू होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे स्थानिक कोकणातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील," असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
- मंत्रालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे वेळापत्रक आणि सागरी सुरक्षेसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी परिवहन व बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मे. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.चे संचालक जॉन फर्नांडिस, संचालक सुरज देवाढीया यांच्यासह अंबर आयंदे आणि डॉ. निलेश बानवलीकर आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या