Pune Maval Landslide : पुण्यात मावळमध्ये दरड कोसळून घर गाडले; 9 जणांची सुटका,युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात पहाटे दरड कोसळून एका कुटुंबाचे घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. (Pune Landslide)


http://prahaar.in/2026/07/09/inquiry-into-unauthorized-constructions-in-the-eco-sensitive-zones-of-mahabaleshwar-and-matheran/

प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानंतर घरातील सदस्य अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), लष्कर, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे बचाव मोहीम सुरू केली. (Pune Disaster)


बचाव पथकांनी आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, आणखी ८ ते ९ जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध सुरू आहे. जेसीबी आणि अत्याधुनिक बचाव उपकरणांच्या मदतीने मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे.



स्थानिकांच्या माहितीनुसार, पहाटे अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण घर मातीखाली गाडले गेले. सततच्या मुसळधार पावसामुळे परिसरातील डोंगरभाग अस्थिर झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


जिल्हा प्रशासनाने नागरिकांना डोंगरपायथ्याच्या आणि दरडप्रवण भागात सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत अधिकृत माहितीचीच दखल घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी