IND vs ENG: निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल ! तिलक,वरुण संघातून बाहेर;संजू सॅमसनचे पुनरागमन ?

ब्रिस्टल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (9 जुलै) ब्रिस्टलच्या काउंटी ग्राउंडवर रंगणार आहे. मालिकेत 0-2 अशी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे.जर का भारतीय संघाचा या सामन्यात पराभव झाला तर संघाला मालिका गमावावी लागेल.या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगीतले जात आहे. (Vaibhav Sooryvanshi)



सलग तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या तिलक वर्माला प्लेइंग -११ मधील त्याचे स्थान धोक्यात असल्याचे सांगीतले जात आहे. त्याच्या जागी टी-20 विश्वचषक 2026 मधील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट संजू सॅमसन याचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजू सॅमसनला या मालिकेत पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागी वैभवला संधी देण्यात आली होती.वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने छाप पाडली असली, तरी मोठी खेळी करण्यात तो ही अपयशी ठरला आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आहे.(Ind vs Eng )



गोलंदाजीतही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मागील सामन्यात महागडा ठरलेल्या वरुण चक्रवर्तीला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची शक्यता आहे.वॉशिंग्टन सुंदरच्या समावेशामुळे भारताला फिरकी गोलंदाजीसोबतच खालच्या फळीत फलंदाजीसाठी एक अतिरिक्त फलंदाज उपल्बध होणार आहे. दरम्यान, कर्णधार श्रेयस अय्यरवरही मोठी जबाबदारी असणार आहे.मालिका जिवंत ठेवण्यासाठी भारताला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत सर्वोत्तम कामगिरी करण्याची गरज आहे.(Ind vs Eng )




भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा,अर्शदीप सिंग,प्रिन्स यादव

Comments
Add Comment

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या