Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार असून, या गाडीमध्ये तब्बल २२ पैकी ११ जनरल डबे असल्याने आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक १९०२१/१९०२२ उधना–ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेसच्या (Amrit Bharat Express) फेऱ्यांची वारंवारता वाढवण्यास मंजुरी दिली आहे.



रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान


आतापर्यंत ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावत होती. मात्र गुरुवारपासून ही सेवा दैनिक करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील हजारो कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवासी उधना, सुरत आणि परिसरातील औद्योगिक भागात ये-जा करतात. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस (Amrit Bharat Express) जी सध्या उधना येथून रविवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटते, ती आता दररोज सकाळी ७.१० वाजता उधना येथून सुटेल.


त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस जी सध्या ब्रह्मपूर येथून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सुटते, ती देखील आता दररोज रात्री ११.४५ वाजता ब्रह्मपूर येथून सुटेल. ही गाडी नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ आणि नागपूर मार्गे धावत असल्याने खान्देश आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणी मिळाली आहे. केवळ कामगारच नव्हे, तर विद्यार्थी, व्यावसायिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.



असे आहे दोन्ही बाजूचे वेळापत्रक


१९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस उधना येथून दररोज सकाळी ७.१० वाजता सुटल्यानंतर वाटेत नवापूर स्थानकावर ८.२८ वाजता, नंदुरबार स्थानकावर ९.३५ वाजता, दोंडाईचा स्थानकावर १०.०३ वाजता, शिंदखेडा स्थानकावर १०.२३ वाजता, अमळनेर स्थानकावर ११.०३ वाजता, धरणगाव स्थानकावर ११.३८ वाजता, जळगाव स्थानकावर दुपारी १२.३२ आणि भुसावळ स्थानकावर दुपारी १ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल. त्याचप्रमाणे १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस ब्रम्हपूर येथून दररोज रात्री ११.४५ वाजता सुटल्यानंतर वाटेत भुसावळ स्थानकावर तिसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता, जळगाव स्थानकावर २.३८ वाजता, धरणगाव स्थानकावर ३.३० वाजता, अमळनेर स्थानकावर ३.४८ वाजता, शिंदखेडा स्थानकावर ४.२३ वाजता, दोंडाईचा स्थानकावर ४.४३ वाजता, नंदुरबार स्थानकावर ५.२५ वाजता आणि नवापूर स्थानकावर सकाळी ६.२६ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल.


दरम्यान, या गाडीला दररोज सुरू करण्यासाठी धरणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे मंत्रालयाने त्यास मंजुरी दिल्याने खान्देशातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी