Kiara Advani : 'टॉक्सिक'साठी कियारा अडवाणीने घेतले तब्बल 'इतक्या' कोटींचे मानधन; कारकिर्दीतील सर्वाधिक फी

Kiara Advani : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) अनेकांच्या मनावर राज्य करते. कबीर सिंग चित्रपटानंतर (kabir singh movie) कियारा अडवाणी आणखी प्रकाशझोतात आली होती. त्यांनतर ती चर्चेत होती. सध्या कियारा तिच्या आगामी 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कन्नड सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत असलेल्या या पीरियड गँगस्टर चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कियारा 'नादिया' ही भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटासाठी कियाराच्या मानधनाबाबत मोठा खुलासा झाला आहे.



सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत कियारा


123 तेलुगूच्या अहवालानुसार, कियाराने 'टॉक्सिक'साठी विक्रमी मानधन घेतले असून तिला या चित्रपटासाठी तब्बल १५ कोटी रुपये मिळाले आहेत. हे मानधन तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच कियाराचा देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीतही समावेश झाला आहे. दरम्यान, नुकतेच 'टॉक्सिक'मधील पहिले गाणे 'तबाही' प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात यश आणि कियारा यांची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळत असून कियारा अत्यंत ग्लॅमरस अंदाजात झळकली आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे.



'टॉक्सिक' मध्ये हे कलाकार


'टॉक्सिक' या चित्रपटात नयनतारा (Nayantara), हुमा कुरेशी (Huma Qureshi) , तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि रुक्मिणी वसंत (Rukmini Vasant) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, यश आणि गीतू मोहनदास यांनी मिळून चित्रपटाची कथा लिहिली आहे. यश या चित्रपटाचे निर्मातेही आहेत. हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.



चित्रपटांसाठी अभिनेत्री किती मानधन घेतात ?


सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींबाबत बोलायचे झाल्यास, IMDbनुसार प्रियांका चोप्रा जोनास (priyanka chopra jonas) एका चित्रपटासाठी सुमारे १८ ते ३० कोटी रुपये मानधन घेते. तर दीपिका पदुकोण (Deepika Padukone) १५ ते ३० कोटी, कंगना रणौत १५ ते २७ कोटी, आलिया भट्ट १० ते २० कोटी आणि करीना कपूर ८ ते १८ कोटी रुपये मानधन आकारत असल्याचे सांगितले जाते.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी