Meta Business Agent : व्हॉट्सअ‍ॅपकडून ‘मेटा बिजनेस एजंट एआय’ची घोषणा, व्यवसायांना २४x७ ग्राहक सेवा देण्यासाठी नवे एआय समाधान

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपने मुंबईत आयोजित वार्षिक बिझनेस समिट २०२६मध्ये व्यवसायांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत ‘मेटा बिजनेस एजंट एआय’ सादर केले. या नव्या एआय-आधारित सुविधेमुळे व्यवसायांना २४ तास, सातही दिवस ग्राहकांशी संवाद साधणे, चौकशींची उत्तरे देणे आणि विक्री प्रक्रियेला गती देणे शक्य होणार आहे. यासोबतच मोठ्या उद्योगांसाठी ‘मेटा बिजनेस एजंट प्लॅटफॉर्म’ ही उपलब्ध करून देण्यात आला आहे.



मेटा बिजनेस एजंट हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हर्च्युअल सहाय्यक असून तो ग्राहकांच्या प्रश्नांना तत्काळ उत्तरे देणे, उत्पादनांची शिफारस करणे, अपॉइंटमेंट बुक करणे, संभाव्य ग्राहकांची प्राथमिक माहिती तपासणे तसेच विक्री पूर्ण होईपर्यंत मदत करणे अशी अनेक कामे स्वयंचलितपणे करू शकतो. आवश्यकतेनुसार कोणत्या टप्प्यावर मानवी प्रतिनिधीने संवादात सहभागी व्हावे, यावरही व्यवसाय मालकांचे नियंत्रण राहणार आहे. ग्राहकांशी संवाद साधण्याबरोबरच हा एआय व्यवसाय मालकांसाठी विश्लेषक म्हणूनही काम करणार आहे. मोठ्या उद्योगांसाठी सादर करण्यात आलेला मेटा बिजनेस एजंट प्लॅटफॉर्म व्यवसायांना स्वतःचे एआय एजंट तयार करण्याची, त्यांना आवश्यकतेनुसार कस्टमाइझ करण्याची आणि मोठ्या प्रमाणावर वापरण्याची सुविधा देणार आहे.



मेटाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री हेड अरुण श्रीनिवास यांनी सांगितले की, भारत हा संभाषण-आधारित व्यवसायासाठी जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा बाजार आहे. ग्राहकांशी अधिक प्रभावी नाते निर्माण करणे, व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एआय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वीगी, मधुलिका एंटरप्रायझेस आणि कायझेन अ‍ॅडव्हेंचर्स यांसारख्या कंपन्यांनी या एआय प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला असून ग्राहक प्रतिसादाचा वेग वाढणे, चौकशीचे व्यवसायात रूपांतर होण्याचे प्रमाण सुधारणे आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणे असे सकारात्मक परिणाम दिसून आल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण