BBL in India : ऑस्ट्रेलियन टी-२० बिग बॅश लीगचे भारतात प्रथमच ऐतिहासिक पदार्पण; चेन्नईत रंगणार पहिला सामना

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठित टी-२० क्रिकेट स्पर्धा बिग बॅश लीग (बीबीएल) प्रथमच भारतात पदार्पण करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी शुक्रवारी या ऐतिहासिक उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत बिग बॅश लीगच्या १६व्या हंगामातील उद्घाटन सामना १२ डिसेंबर रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स आणि विद्यमान विजेता पर्थ स्कॉर्चर्स हे संघ आमनेसामने येतील.(BBL)



हा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. भारतात सामना खेळणारी बिग बॅश लीग ही पहिली परदेशी क्रिकेट लीग ठरेल. डिसेंबरमध्ये भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या आठवडाभर चालणाऱ्या ऑस्ट्रेलियन सांस्कृतिक महोत्सवाचे हे प्रमुख आकर्षण असेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मते, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बाजारपेठ असलेल्या भारतात सामना आयोजित केल्यामुळे लीगची लोकप्रियता आणि प्रेक्षकसंख्या लक्षणीय वाढेल.क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली आहे की हा सामना १२ डिसेंबर रोजी चेन्नईतील ३८ हजार प्रेक्षक क्षमतेच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवला जाईल. मेलबर्न रेनेगेड्स या सामन्यात यजमान संघ असेल. स्थानिक वेळेनुसार सामना दुपारी २:४० वाजता सुरू होईल (भारतीय वेळेनुसार सकाळी अंदाजे १०:३० वाजता). भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओस्टारवर केले जाईल, तर ऑस्ट्रेलियामध्ये चॅनल सेव्हन, ७प्लस, कायो स्पोर्ट्स आणि फॉक्स क्रिकेटवर थेट प्रसारण होईल.(Narendra Modi)



क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि ऑस्ट्रेलियाच्या महावाणिज्य दूतावासाच्या सहमतीने चेन्नईची निवड करण्यात आली. शहरातील क्रिकेटविषयीचे प्रचंड आकर्षण आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचा मोठा चाहता वर्ग लक्षात घेऊन या ऐतिहासिक सामन्यासाठी चेन्नई हे सर्वात योग्य ठिकाण मानण्यात आले.क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अपेक्षा आहे की या उपक्रमामुळे बिग बॅश लीगला भारतात नवी ओळख मिळेल आणि भविष्यात भारत-ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य आणखी मजबूत होईल.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात