Astronaut Anil Menon : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन अंतराळ मोहिमेसाठी १४ जुलैला होणार रवाना

कझाकस्तान : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन हे १४ जुलै रोजी कझाकस्तानमधील बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या आठ महिन्यांच्या मोहिमेसाठी रवाना होणार आहेत. मिनियापोलिस येथे युक्रेनियन आणि भारतीय वंशाच्या पालकांच्या पोटी जन्मलेले मेनन हे आपत्कालीन वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टर असून अमेरिकेच्या स्पेस फोर्समध्ये कर्नल पदावर कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्यास असताना मेनन दीर्घकालीन अंतराळ प्रवासाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीरांच्या रक्ताभिसरणावर, रक्तवाहिन्यांच्या संरचनेवर आणि रक्ताच्या घटकांवर नेमका कसा परिणाम होतो, याचा ते सखोल अभ्यास करतील.



मेनन हे रशियाच्या रोस्कोस्मोस संस्थेच्या सोयुझ एमएस-२९(MS)या अंतराळयानातून अंतराळात झेप घेणार आहेत. त्यांच्या सोबत रशियन अंतराळवीर प्योत्र दुब्रोव्ह आणि अॅना किकिना हे देखील या मोहिमेत सहभागी असतील. अमेरिकन हवाई दलातील सेवाकाळात त्यांनी ‘ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडम’ अंतर्गत अफगाणिस्तानमध्ये अग्रभागी काम केले. तसेच हिमालयन रेस्क्यू असोसिएशनसोबतही त्यांनी कार्य केले आहे. ४९ वर्षीय अनिल मेनन यांनी रोटरी अॅम्बेसेडोरियल स्कॉलर म्हणून भारतात एक वर्ष घालवले होते. या काळात त्यांनी पोलिओ लसीकरण मोहिमांचा अभ्यास केला आणि त्या मोहिमांमध्ये सक्रिय सहकार्य केले.



अनिल मेनन यांनी २०१४ मध्ये नासामध्ये फ्लाइट सर्जन म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या अंतराळवीरांसोबत जवळून काम केले. २०१८ मध्ये ते स्पेसएक्समध्ये दाखल झाले, जिथे त्यांनी कंपनीचा वैद्यकीय कार्यक्रम सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्पेसएक्सच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीत योगदान दिले तसेच स्टारशिप प्रकल्पाच्या विकासातही महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांची नासाच्या अंतराळवीर गटासाठी निवड झाली. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी अॅना विल्हेल्म या देखील अंतराळवीर आहेत.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.