Moshi Building Collapse : दीड वर्षांचा संसार क्षणात उद्ध्वस्त; पत्नीला शेवटचा मेसेज पाठवून भावेशवर काळाचा घाला

मोशी (पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील मोशी (Moshi) कचरा डेपो (Garbage Depot) परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेत (Accident) एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 'अॅथेना वेस्ट' (Athena Waste) कंपनीत वरिष्ठ कार्यकारी लेखापाल (Senior Executive Accountant) म्हणून कार्यरत असलेले भावेश मोहन वाणी (Bhavesh Mohan Wani) यांचा इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्यानंतर जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



'मी जेवायला बसलोय'... ठरला शेवटचा मेसेज


बुधवारी दुपारच्या जेवणाच्या (Lunch Break) सुटीत भावेश कॅन्टीन (Canteen) मध्ये जेवण्यासाठी बसले होते. जेवण सुरू करण्यापूर्वी त्यांनी पत्नी (Wife) मोहिनी यांना, "मी जेवायला बसलोय" असा मेसेज (Message) पाठवला. मात्र काही क्षणांतच कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला आणि सिमेंटचा मोठा खांब त्यांच्या डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा मेसेजच त्यांच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरला.



दीड वर्षांपूर्वीच झाला होता विवाह


भावेश आणि मोहिनी यांचा विवाह (Marriage) अवघ्या दीड वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनी नव्या आयुष्याची अनेक स्वप्नं रंगवली होती. मात्र एका क्षणात काळाने त्यांचा संसार उद्ध्वस्त केला. संघर्षातून उभं राहिलेलं कुटुंब पुन्हा हादरलं. मूळ जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वाणी कुटुंब अत्यंत संघर्षमय आयुष्य जगले. वडील मोहन वाणी यांनी पापड आणि पाव विकून मुलाला शिक्षण दिलं. दहा वर्षांपूर्वी नोकरीसाठी (Job) पुण्यात आलेल्या भावेश यांनी कष्टाच्या जोरावर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिलं. मात्र पाच वर्षांपूर्वी बहिणीच्या निधनाचा धक्का सहन केलेल्या या कुटुंबावर आता एकुलता एक मुलगाही गमावण्याची वेळ आली आहे.



ड्युटी बदलली आणि घडला अनर्थ


भावेश मोशी आणि कासारवाडी (Kasarwadi) कार्यालयांची जबाबदारी सांभाळत होते. त्यांचे सहकारी राहुल पाटील यांनी सांगितले की, मागील तीन दिवस ते कासारवाडीत कार्यरत होते. मात्र बुधवारी त्यांची ड्युटी मोशी कार्यालयात लागली आणि त्याच दिवशी ही दुर्दैवी दुर्घटना घडली.



एकुलता एक मुलगा गमावल्याचा धक्का आई शालिनी वाणी यांना सहन झाला नाही. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने वायसीएम (YCM) रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणि बचावकार्य (Rescue Operation) याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी