Nashik News : आधी पत्नी आता पतीचाही मृत्यू, शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं अन होत्याचं नव्हतं झालं; घटनेनं गूढ वाढलं

Nashik News : काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या बागलाण (Baglan) तालुक्यातील आखतवाडे (Akhatwade) येथे एका शेतकरी दाम्पत्याने रात्री जेवणात चिकन खाल्यांनंतर त्यांनी दही खाल्ले आणि त्यांनतर थोड्यावेळाने दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडल्याची घटना घडली. या घटनेत उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाला होता, तर पतीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आता 10 दिवसानंतर पतीचा देखील मृत्यू झाला आहे.


राज्यात खाण्या-पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ हा मुद्दा सध्या राज्यभरात चर्चेत आहे. मध्यंतरी मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूबाबतही अनेक उलट सुलट चर्चा सुरु होत्या. दरम्यान आता बागलाण मध्येही अशीच घटना समोर आली आहे.



नेमकं काय घडलं ?


28 जून रोजी रात्री चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (Dwarkabai Shantaram Hallij) यांचा मृत्यू झाला. तर, त्यांचे पती शांताराम ह्याळीज (Shantaram Hallij) यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून दोघांच्याही मृत्यूमागचं कारण मात्र अद्याप गुलदस्तात आहे.



अन्न व औषध प्रशासनाकडून दखल


या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक गेल्या आठवड्यात आखतवाडे येथे दाखल झाले होते. पथकाने संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे नमुने संकलित केले होते. सदर नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते. मात्र, अद्यापही या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाही. अहवालातून विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याने हा अहवाल महत्वाचा असणार आहे.



वैद्यकीय तज्ज्ञाच्या मतं विषबाधा


दरम्यान, या विषबाधेच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती, नेमकी विषबाधा चिकनमुळे झाली की दह्यामुळे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. मात्र, या प्रकरणातील नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही.

Comments
Add Comment

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी