Crime News : २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; एक्स गर्लफ्रेंडचा कॉल आला आणि....

रायपूर : रायपूर मधील छत्तीसगडच्या भिलाईत परिसरात बुधवारी(Wednesday) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शादाब शेख (१९ वय) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. शादाब त्याच्या प्रियसीसोबत(२३ वय)संध्याकाळी ६ वाजता ओयो हॉटेल मध्ये गेला होता. दोघांनी रात्री हॉटेलच्या खोलीत मद्यपान केले असल्याची माहिती समोर आली आहे.



दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते याच दरम्यान शादाबच्या मोबाईलवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा कॉल आला. यावरुन शादाब आणि त्याच्या प्रेयसीचा वाद झाला. वादानंतर तरुणीनं मद्यधुंद अवस्थेत स्वत:च्या हाताची नस कापून घेतली. यानंतर ती बेशुद्ध होऊन कोसळली. अशातच प्रेयसीला अशा अवस्थेत पडलेली पाहताच शादाबनं त्याच खोलीत गळफास घेऊन जीव दिला.(Crime News)


प्रेयसीचीच ओढणी घेऊन त्याचे गळफास लावून जीवन संपवलं. बेशुद्ध असलेल्या तरुणीला सकाळी शुद्ध आल्या वर तिने शादाबला गळाफास लावलेल्या स्थितीत पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीच सरकली. तिने तातडीने हॉटेलच्या कर्मच्याऱ्यांकडे धाव घेतली आणि त्यांच्या मदतीने शादाब उपचारांसाठी जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.



घटनेची माहिती मिळताच स्मृती नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी हॉटेलच्या खोलीची झडती घेऊन महत्त्वाचे पुरावे गोळा ताब्यात घेतल. चौकशी साठी हॉटेल कर्मचारी आणि तरुणीला ताब्यात घेतले. मात्र तरुणाने आत्महत्या का केली हे अजून पर्यंत स्पष्ट झाल नाही आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज पोलीस तपासत आहेत. शादाबचं शव पोलिसांनी उत्तरीय चाचणीसाठी पाठवलं आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावर मृत्यूमागील नेमक्या कारणाचा उलगडा होईल.

Comments
Add Comment

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन, 31 फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन; पाहा खास क्षण

[caption id="attachment_1066607" align="aligncenter" width="800"] त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन