Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात 'ऑपरेशन शोध-खत’ ,15 दिवसांत 98 अल्पवयीन मुलांचा शोध

Ahilyanagar : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार राज्यात ‘ऑपरेशन शोध-खत’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी (Ahilyanagar District Police) उल्लेखनीय यश मिळवत एकूण 98 बेपत्ता बालकांचा शोध लावला आहे. शोधण्यात आलेल्या सर्व बालकांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



15 दिवसांत 98 अल्पवयीन मुलांचा शोध


'ऑपरेशन शोध-खत’ ही विशेष मोहीम 8 ते 23 जून 2026 या कालावधीत अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हात राबवण्यात आली. हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. मोहिमेदरम्यान 90 मुली आणि 8 मुले, अशा एकूण 98 बेपत्ता बालकांचा (Missing children) शोध घेण्यात पोलिसांना यश आले. या सर्वांची आवश्यक कायदेशीर पडताळणी आणि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे (Police Station) , उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतील विशेष पथके तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (Anti-Human Trafficking Unit) यांनी समन्वयाने या मोहिमेसाठी काम केले.



भविष्यातही मोहीम राबवणार


नागरिकांनी त्यांच्या परिसरात कोणतेही बेपत्ता बालक आढळल्यास किंवा संशयास्पद माहिती मिळाल्यास ती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यासोबतच अल्पवयीन मुलांचे अपहरण, बेपत्ता होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि हरवलेल्या बालकांचा वेगाने शोध घेण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



विशेष पथकांकडून शोध


ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर तसेच इतर जिल्ह्यांतील पोलिसांशी प्रभावी समन्वय साधला. प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याने स्वतंत्र विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबविली. त्यामुळे कमी कालावधीत मोठ्या संख्येने बेपत्ता बालकांचा शोध घेणे शक्य झाले.


दरम्यान, ही मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) , अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे (Vaibhav Kalubarme) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले (Ganesh Ugale) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे (Kiran Shinde) आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

Comments
Add Comment

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म