BMC News : महापौर, आयुक्तांनी सुपरवुमन प्रमाणे काम करावे, सभागृहात सदस्यांनी मांडल्या भावना

मुंबई : मुंबईत पावसाळ्यातील दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी दिर्घकाळ उपाययोजनांची गरज असून केवळ अशा दुर्घटनांमध्ये जे बळी गेले आहेत त्याप्रकरणी आपल्याच अधिकाऱ्यांना निलंबित करत आहोत. पण अशा दुघर्टनांमध्ये कंत्राटदारांवर कडक कारवाई व्हायला हवी, त्यांना कायमचे काळ्या यादीत टाकायला हवे अशी मागणी सभागृहात करण्यात आली. तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांची हाती महापालिकेचे कमान असून त्यांनी दोघांनी सुपरवुमनला (Super Women) साजेसे काम करावे अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली.



मुंबईत (Mumbai) पावसाळ्यातील दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर सर्व आवश्यक व आपत्कालिन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सभेमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी राजकारण न करता लोकांचे जीव कसे जाणार नाही याबाबत उपाययोजना करण्यासाठी ही सभा असल्याचे सांगितले. मागील सहा दिवसांमध्ये झाड, मॅनहोल्स, घर पडणे आदी दुघर्टनांमध्ये ११ जणांचे बळी आणि २८ जण जखमी झाले आहेत, अशी जंत्रीच वाचून दाखवली. दुघर्टनांमध्ये माणसांचे बळी जात असताना सर्व बधिर झाल्यासारखे झालेले असून महापालिकेची (BMC) अवस्था आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी झाली आहे. यावर बोलतांना अश्रफ आझमी यांनी सत्ताधारी पक्षाने याची जबाबदारी स्वीकारायला हवी असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सईदा खान यांनी मुंबई शहराची ही फुफ्फुसे जपणाचा प्रयत्न केला गेला पाहिजे असे सांगत हरित लवादाच्या नियमांचे पालनही होत नसल्याची तक्रार केली. तर उबाठाचे शैलेश फणसे यांनी मुंबईतील दुघर्टनांची नैतिकता स्वीकारुन महापौर रितू तावडे यांनी राजीनामा द्यायला हवी अशी मागणी केली. तर यामिनी जाधव यांनी महापौरांच्या राजीनाम्यांची मागणी करणाऱ्या विरोधकांना सवाल करत सन २००५मध्ये जेव्हा महाप्रलंय आता होता, त्यावेळच्या महापुराच्या वेळी तत्कालिन महापौरांनी राजीनामा दिला होता असा सवाल केला, तर प्रकाश दरेकर यांनी जो राम का नहीं हो किसी कें काम नहीं असे सांगत उबाठाच्या बेगडी राम प्रेमाची खिल्ली उडवली. स्वप्ना म्हात्रे यांनीही रामाच्या नावावर राजकारण करणे योग्य नसून झाडे पडणे हे काही याच वर्षी घडते का? मग आत्ताच का विशेष सभा घेतात, आणि आत्ता घ्यायचे आणि नंतर विसरुन जायचे हे योग्य नसल्याचे सांगितले. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी आमचा पक्ष आणि महापालिकेतील नेते हे संवेदनशील असून त्यामुळे दुघर्टनांनंतर सकृत दर्शनी दोषी दिसून येणाऱ्यांवर कारवाई झाली. तसेच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या मुख्यमंत्र्यांना भेटल्या, म्हणजे आजही आमचे मुख्यमंत्री कुणालाही भेटतात हे यातून दिसून येत आहे. नैतिकता आम्हाला शिकवू नका, तुमच्यात जर नैतिकता होती तर मग १९ ऑगस्ट २०१७मध्ये मॅनहोलमध्ये पडून डॉ अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्यानंतर महापौरांनी राजीनामा का दिला नाही, त्यांचा राजीनामा मागितला नाही असा सवाल केला.


शिवसेनेच्या समृध्दी काते यांना चेंबूर घटनेत मुलगा गमावलेल्या आईचे दुःख सांगताना रडू कोसळले.. उबाठाच्या श्रद्धा जाधव यांनी मुंबईत मॅनहोल मध्ये अंतर्गत सुरक्षा जाळ्या बसवल्याची आकडेवारी किती खरी आणि किती खोटी? त्यामुळे या जाळ्या बसवलेल्या प्रत्येक मॅनहोल्सचा सर्वे केला जावा... जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल..अशी मागणी केली.


यावेळी झालेले चर्चेत एमआयएमचे विजय उबाळे,नवनाथ बन, मेहेर हैदर, अंकित प्रभू, सचिन पडवळ, दिक्षा कारकर, संध्या दोषी, किरण लांडगे, प्रविण छेडा आदींनी चर्चेत भाग घेतला होता.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा