Crime News : चुलत भावासोबत मिळून केली सख्ख्या आई-वडिलांची हत्या ;

मुंबई : आपण आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करतो. त्यांना नेहमी सुखात आणि आनंदात ठेवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट आणि धडपड करत असतो. मात्र काही वेळा नात्यांना काळीमा फासणाऱ्या भयंकर घटना समोर आल्यावर अगदी तळपायाची आग मस्तकात जाते. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका अंतिम वर्षातील तरुणीने स्वतःच्या आईची अपघाताचा बनाव रचून हत्या केल्याची धक्कादायक आणि थरारक घटना जयपूर येथे उघडकीस आली आहे.


जयपूर येथील कोर्टात कारकून म्हणून काम करणाऱ्या नीरज शर्मा(Niraj Sharma) यांचा 3 जुलै रोजी एका वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने चिरडल्यामुळे मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा निव्वळ रस्ता अपघात वाटत होता, पण पोलिसांनी जेव्हा सखोल तपास केला, तेव्हा नीरज शर्मा यांची मुलगी आयुषीने कट रचल्याचं समोर आले आहे. या भयानक कटकारस्थानात आयुषीचा चुलत भाऊ बलराम हा देखील सामील असल्याच समजलं आहे. आयुषीने हा अपघात घडवून आणण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी हेमंत, आकाश, मोहित, अरविंद आणि रोहित यांना बेड्या ठोकल्या आहेत.(Crime News)



आयुषीने असं का केलं असेल ?


तिने वडील हे विजय शर्मा हे कोर्ट मास्तर होते. त्यांच्या निधनानंतर पत्नी नीरज शर्मा यांना कोर्टात सरकारी नोकरी मिळाली होती. मात्र आयुषी यामुळे निराश होती कारण तिला तिच्या आईच्या जागी ती सरकारी नोकरी हवी होती, तसेच कुटुंबाच्या संपूर्ण मालमत्तेवरही डोळा होता. यामुळे ती तिच्या आईशी सतत वाद घालायची. तिने तिचा चुलत भाऊ बलराम आणि त्याचे वडील मोहन यांनी मिळून नीरज शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता.


हत्याकेल्या नंतर संपूर्ण मालमत्तेचे तिघात समसमान वाटप करण्याचे त्यांचे ठरले होते. ती काही काळापासून काका मोहन आणि चुलत भाऊ बलराम यांच्यासोबतच राहत होती. पोलीस तपासात आयुषी आणि बलराम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचेही समोर आले आहे.



वडिलांची देखीर हत्या केली ;

या प्रकरणात एक आता अत्यंत धक्कादायक वळण आले आहे. आयुषीचे मामा राकेश शर्मा यांनी थेट पोलिसांत धाव घेत आयुषीनेच तिच्या वडिलांचीही हत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. गेल्या वर्षी आजारपणाने मरण पावलेले विजय शर्मा(Vijay Sharma) यांना जेव्हा ब्रेन स्ट्रोक आला होता, तेव्हा आयुषी आणि बलराम यांनी त्यांना एका अज्ञात रुग्णालयात दाखल केले होते.
तब्बल 3 महिने त्यांनी कुटुंबाला उपचारांबाबत पूर्णपणे अंधारात ठेवले होते. आईने वारंवार जाब विचारल्यानंतर त्यांनी वडिलांना घरी आणले, मात्र तोपर्यंत त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. आयुषीनेच वडिलांची फीडिंग ट्यूब म्हणजेच अन्नाची नळी काढून घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप आता मामाने केला आहे.


या संपूर्ण कटातील मुख्य आरोपी असलेला तिचा चुलत भाऊ बलराम अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मामाच्या नवीन आरोपानंतर पोलीस आता वडिलांच्या मृत्यूच्या अँगलनेही या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.