Healther Knight : भारताविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीनंतर हिथर नाइटची निवृत्ती; इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप !

लंडन : इंग्लंड महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार हिथर नाइट हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेला एकमेव कसोटी सामना तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरणार आहे. लॉर्ड्सवरील हा महिला दोन्हीही संघांमधील पहिलाच कसोटी सामना असून, या ऐतिहासिक लढतीनंतर हिथर नाइट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणार आहे.



नाइटने २०१९ साली इंग्लंडकडून पदार्पण केले होते. तब्बल 16 वर्षांच्या कारकि‍र्दीत नाइटने संघासाठी तिन्हीही फॉर्मेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तिन्ही फॉर्मेट मिळून नाइटने इंग्लंडसाठी ३२० आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. यात तिने ७,९८८ धावा करत सहा शतके झळकावले आहेत. टी-२० विश्वचषक २०२० मध्ये तिने विक्रमी शकत करत इंग्लंडसाठी तिन्हीही फॉर्मेटमध्ये शतक करण्याचा मान मिळवला आहे. नाइटने २०१६ ते २०२५ या कलावधीत नाइटच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी केली होती. तिच्या नेतृत्वातखाली संघाने १९९ सामन्यात १३४ सामन्यांमध्ये विजय मिळवले आहे. विशेष म्हणजे, २०१७ च्या महिला वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा ९ धावांनी पराभव करून इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात तिची महत्त्वाची भूमिका होती. (Ind Vs Eng)





निवृत्तीची घोषणा करताना नाइट म्हणाली, इंग्लंडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा निर्णय भावनिक असला तरी योग्य वेळी घेतला जात आहे. आता आयुष्यातील नव्या पर्वासाठी मी उत्सुक आहे. दरम्यान, लॉर्ड्स कसोटीत भारताने पहिल्या डावात २८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव १७० धावांवर आटोपला असून, भारताने दुसऱ्या डावात एक विकेट गमावत १५४ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून