Iran-US War : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद; इराणच्या निर्णयाने खळबळ, ट्रम्प संतप्त

इराण : इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (Islamic Revolutionary Guard Corps - IRGC) रविवारी होर्मुझ सामुद्रधुनी (Hormuz Strait) बंद केल्याची घोषणा केली. चुकीच्या मार्गाने प्रवास करणाऱ्या एका जहाजावर (Ship) कारवाई करून ते थांबवण्यात आल्याचा दावा IRGC ने केला आहे. या घटनेनंतर परिसरातील तणाव आणखी वाढला असून, अमेरिकेने (United States - US) इराणविरोधात नव्या लष्करी कारवाया (Military Strikes) सुरू केल्याचे जाहीर केले आहे.


IRGC च्या नौदलाने (Navy) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित जहाजाने आपली ट्रॅकिंग प्रणाली (Tracking System) बंद करून समुद्री सुरक्षेला (Maritime Security) धोका निर्माण केला होता. त्यामुळे त्या जहाजावर कारवाई करण्यात आली आणि ते ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्या जहाजाची ओळख किंवा इतर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.


दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (US Central Command - CENTCOM) इराणविरोधात तिसऱ्या टप्प्यातील हल्ले (Third Round of Strikes) सुरू केल्याची माहिती दिली. अमेरिकेने आरोप केला की, इराणकडून व्यापारी जहाजांना (Commercial Ships) लक्ष्य केले जात असून, त्यांची ही क्षमता कमी करण्यासाठी लष्करी कारवाई सुरू ठेवली जाईल.




या आठवड्यात तिसऱ्यांदा हल्ला


अमेरिकन लष्कराने (US Military) शनिवारी रात्री इराणविरोधात नवीन हल्ले सुरू केल्याचे सांगितले. हा या आठवड्यातील तिसरा हल्ला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सायप्रसच्या (Cyprus) ध्वजाखालील कंटेनर जहाजावर (Container Ship) झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या हल्ल्यात जहाजावरील एका कर्मचाऱ्याचा (Crew Member) अद्याप शोध लागलेला नसल्याचेही सांगण्यात आले.


CENTCOM ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वरील पोस्टमध्ये म्हटले की, व्यापारी जहाजांवरील (Commercial Vessels) पूर्वीच्या हल्ल्यांबाबत इराणला आंतरराष्ट्रीय करारांचे (International Agreements) पालन करण्याची आणखी एक संधी देण्यात आली होती. मात्र, त्यातही इराण अपयशी ठरल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.