Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरांचा धुमाकूळ! ६७ महिला, २२ पुरुषांसह ८९ संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात (Palkhi Procession) लाखो वारकरी भक्तीभावाने सहभागी झाले होते. मात्र, या पवित्र सोहळ्यालाच काही चोरट्यांनी गालबोट लावल्याचे समोर आले आहे. गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या (Gold Chains), मंगळसूत्रे आणि महागडे मोबाईल (Mobile) चोरणाऱ्या टोळीविरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करत तब्बल ८९ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान शहरात चोरीच्या ११ घटना नोंदवण्यात आल्या. त्यापैकी ९ घटना हडपसर (Hadapsar) परिसरात घडल्याने खळबळ उडाली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी वारकऱ्यांचे मोबाईल आणि दागिने लंपास केले. या प्रकरणी हडपसर, समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, वानवडी आणि खडकी पोलीस ठाण्यांमध्ये (Police Station) स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) चार विशेष पथके (Special Teams) तैनात केली होती. या कारवाईदरम्यान ६७ महिला आणि २२ पुरुष अशा एकूण ८९ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू असून, वारीच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी महिला चोरांची मोठी टोळी सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे.

वानवडी (Wanwadi) परिसरातील शंकरमठ-रामनाथ मळा येथे पालखी दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाच्या पँटच्या खिशातून सुमारे ४० हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखत दोन संशयितांना रंगेहात पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला आहे.



इतकी मोठी कारवाई करूनही हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना कशा घडल्या, याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. दरम्यान, पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी गर्दीत आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि मोबाईलची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी