Gold, Silver Price Today : सोने, चांदीचे दर घसरले; जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेतील आजचे दर किती ?

Gold, Silver Price Today : आज सोने तसेच चांदी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. मागील आठवड्याच्या अखेरीस सोने, चांदीच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार होती. मात्र, नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन्ही धातूंचे दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Gold, Silver Price Today)



सोने, चांदीचे दर घसरले


सोने, चांदीचे भाव ठरण्यासाठी जागतिक बाजारपातळीवरील घडामोडी महत्त्वपूर्ण ठरतात. सध्या अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठांमध्ये पुन्हा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा परिणाम कच्च्या तेलासह इतर मौल्यवान धातूंच्या किमतींवरही दिसून येत आहे. या घडामोडींमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहे आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीच्या किमतींवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिल्याने दोन्ही धातूंच्या दरांमध्ये घसरण नोंदवण्यात आली. (Gold, Silver Price Today)


कॉमेक्सवरील व्यवहारांमध्येही सोन्याच्या किमती सुमारे १.१२ टक्क्यांनी म्हणजेच ४६.२० डॉलरने घसरून प्रति औंस ४,०६७.५० डॉलर इतक्या झाल्या. त्याचप्रमाणे चांदीच्या किमतींमध्येही २.६४ टक्क्यांची घसरण झाली असून, त्या प्रति औंस ५८.५७५ डॉलर या पातळीवर आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, मौल्यवान धातूंमधील अलीकडील घसरण ही नफा वसूली, डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे झाली असली, तरी दीर्घकालीन दृष्टीने मौल्यवान धातूंना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमतींमधील या नरमाईचा सकारात्मक परिणाम दागिन्यांच्या विक्रीवर दिसू लागला आहे. (Gold, Silver Price Today)



सोन्याचे दर किती घटले ?


शनिवारी जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत १०३ रुपयांची किरकोळ वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४७,९०८ रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १४४२ रुपयांची घट झाल्याने सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४६,४६६ रुपयांपर्यंत खाली आले. (Gold, Silver Price Today)



चांदीचे दर किती घटले ?


शनिवारी जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत २०६० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,३०,७२० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल ५१५० रुपयांची घट झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,२५,५७० रुपयांपर्यंत खाली आली.

Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी