IND vs ENG ODI : रोहित-विराटचं दमदार पुनरागमन! बुमराहही सज्ज; पहिली वनडे कधी, कुठे आणि किती वाजता?

मुंबई : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. आयर्लंडविरुद्ध २-० आणि इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत ४-० असा धक्का बसल्यानंतर आता टीम इंडिया नव्या जोमाने वनडे क्रिकेटमध्ये उतरणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला १४ जुलैपासून सुरुवात होत असून, या मालिकेत सर्वांचे लक्ष रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्या पुनरागमनाकडे लागले आहे. (IND vs ENG ODI)


अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे विराट कोहलीला खेळता आले नव्हते. मात्र, तो आता पूर्णपणे तंदुरुस्त असून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना अनेक महिन्यांनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी पुन्हा एकदा एकत्र मैदानात पाहायला मिळणार आहे. (IND vs ENG ODI)



याशिवाय, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचेदेखील वनडे संघात पुनरागमन झाले आहे. २०२३ च्या वनडे विश्वचषक फायनलनंतर बुमराह प्रथमच ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे रोहित, विराट आणि बुमराह ही भारताची अनुभवी तिकडी पुन्हा एकत्र मैदानात उतरणार असल्याने मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे. (IND vs ENG ODI)



भारत-इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक :


पहिली वनडे: १४ जुलै – एजबॅस्टन | दुपारी ३.३० वाजता (भारतीय वेळेनुसार)
दुसरी वनडे: १६ जुलै – कार्डिफ | संध्याकाळी ५.३० वाजता
तिसरी वनडे: १९ जुलै – लॉर्ड्स | दुपारी ३.३० वाजता (IND vs ENG ODI)



सामना कुठे पाहता येणार?


भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच मोबाईल आणि वेबसाईटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टारवर उपलब्ध असेल. (IND vs ENG ODI)



भारताचा संभाव्य संघ :


शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, केएल राहुल, इशान किशन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव. (IND vs ENG ODI)

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून