Jalgaon Crime : रावेरमधील ‘त्या’ हत्येचा पोलिसांकडून उलगडा, मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध अन...

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील नांदूरखेडा (Nandurkheda) शिवारात तीन दिवसांपूर्वी एक मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. अखेर या खुनाचा उलगडा झाला असून अनैतिक संबंध आणि जुन्या सूडाच्या भावनेतून मजुराची त्याच्याच मित्राने साथीदाराच्या मदतीने गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस (Police) तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलिसांकडून सुरु आहे. (Jalgaon Crime News )




नेमकं प्रकरण काय ?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित आरोपी गणेश संजय घोरपडे (Ganesh Sanjay Ghorpade) याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. काही महिन्यांपूर्वी हे दोघे ऐनपूर येथे ग्रामस्थांच्या हाती रंगेहात सापडले होते. त्या वेळी ग्रामस्थांनी गणेशला चांगलाच चोप दिला होता. या अपमानाचा आणि मारहाणीचा राग गणेशच्या मनात होता. याच वैमनस्यातून त्याने मयताला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. (Jalgaon Crime News )




गळा आवळून निर्घृण खून


बदल्याची भावना मनात धरून असलेला संशयित आरोपी गणेश घोरपडे (Ganesh Sanjay Ghorpade) आणि त्याचा साथीदार मेघराज सांगळे (Meghraj Sangale) यांनी ९ जुलैच्या रात्री मयताच्या हत्येचा कट रचला. त्यांनी मयताला सोबत घेऊन दारू पाजली आणि त्यानंतर दुचाकीवरून त्याला नांदूरखेडा शिवारात नेले. तिथे मयताची नशेची अवस्था पाहून दोघांनी त्याचा गळा आवळून निर्घृण खून केला आणि मृतदेह शेतात फेकून दोघेही फरार झाले. दोन दिवसांनंतर हा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. (Jalgaon Crime News )




पुढील तपास पोलिसांकडून सुरु


मुख्य आरोपी गणेश घोरपडे (Ganesh Sanjay Ghorpade) हा गुन्ह्यानंतर मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) पळून गेला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने त्याचा शोध सुरू केला. पीएसआय संतोष पवार, हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी आणि सचिन घुगे यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील सागवानी परिसरात सापळा रचून मुख्य आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याचा साथीदार मेघराज सांगळे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण