Nashik : चीनमध्ये नाशिकच्या श्रावणीची सुवर्ण झेप; आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण, एक कांस्य जिंकत रचला इतिहास

Nashik : नाशिकच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानाची बातमी आहे. आज प्रत्येक नाशिककर अभिमानाने श्रावणी सांगळे (Shravani Sangale) हिचे नाव घेत आहे, आणि त्याला कारणही तसंच आहे. चीनमध्ये आयोजित पहिल्या आशियाई २३ वर्षांखालील ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (Athletics Championship) नाशिकच्या श्रावणी सांगळेने आपल्या दमदार कामगिरीने इतिहास रचला आहे. दोन सुवर्ण (Gold) आणि एक कांस्य (Bronze) अशा तब्बल तीन पदकांची कमाई करत श्रावणीने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



नाशिकच्या श्रावणीची सुवर्ण झेप


चीनमधील ऑर्डोस (Ordos) येथे पार पडलेल्या पहिल्या आशियाई २३ वर्षांखालील ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणाऱ्या नाशिकच्या श्रावणी सांगळेने (Shravani Sangale) अप्रतिम कामगिरी करत तीन पदकांची कमाई केली. या स्पर्धेतील सर्वाधिक थरारक क्षण ठरला तो मिश्र ४ बाय ४०० मीटर रिलेच्या अंतिम शर्यतीचा. अंतिम टप्प्यापर्यंत भारतीय संघ चीनच्या मागे होता.


मात्र अँकर धावपटू म्हणून ट्रॅकवर उतरलेल्या श्रावणीने अफाट वेग, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर चीनच्या धावपटूला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. श्रावणी सांगळे सोबत अस्तिक प्रधान, सँड्रामोल साबू, सेतू मिश्रा यांच्या भारतीय संघाने ३ मिनिटे १८.६४ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. महत्त्वाचे म्हणजे भारताने चीनचा अवघ्या ०.१० सेकंदांच्या फरकाने पराभव केला.



श्रावणीची पदकांची हॅट्रिक पूर्ण


याच स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत श्रावणीने ५८.०९ सेकंदांची तिची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवत कांस्यपदकाची (Bronze medal) कमाई केली. या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या सातत्यपूर्ण प्रगतीची पुन्हा एकदा प्रचिती आली. यानंतर महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेतही श्रावणीने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत दुसरे सुवर्णपदक जिंकले. अशाप्रकारे एका स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी तीन पदके जिंकत श्रावणीने पदकांची हॅट्रिक पूर्ण केली.



मेहनतीचं फळ यशाच्या रूपात


श्रावणीने यापूर्वीही आपल्या प्रतिभेची झलक दाखवली होती. २०२४ मध्ये चेन्नई (Chennai) येथे झालेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली होती. त्यानंतर तिच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या आणि त्या अपेक्षांवर तिने यावेळीही खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब केले.


श्रावणी अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये अनुभवी ॲथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत आहे. विशेष म्हणजे, चीनला रवाना होण्यापूर्वीच त्यांनी श्रावणी पदकांची हॅट्रिक करेल, असा विश्वास व्यक्त केला होता आणि श्रावणीने आपल्या कामगिरीतून तो विश्वास सार्थ ठरवला.

Comments
Add Comment

‘शिळ्या कढीला ऊत आणू नका!’ आमदार विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा...

पुणे : “सुषमाताई अंधारे यांनी मला अभ्यासू आमदार असल्याचे मान्य केले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने वडिलांसोबत शेअर केले खास क्षण; कॅप्शन एकदा पहाच...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सोशल मीडियावर एका नवीन पोस्टद्वारे आपले वडील सलीम खान यांच्यासोबतच्या नात्याची

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Ashish Shelar: दिवंगत नाना पाटेकरांना भाजपने दिली होती लोकसभा लढवण्याची ऑफर, मंत्री आशिष शेलार यांचा दावा

 देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः भेट घेतल्याची सांगितली आठवण मुंबई : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाजपकडून

New Mahindra Car Launch: महिंद्राची नवी CNG SUV बाजारात! पाहा किंमत, फीचर्स आणि मायलेज

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीने आपल्या ताफ्यात सीएनजी गाडी लाँच केली आहे. XUV 3XO CNG ही