Ranveer Singh: 'प्रलय'च्या शूटिंगनंतर रणवीर सिंग घेणार विश्रांती; ब्रेकचे नेमकं कारण आलं समोर 

शुटिंग संपताच रणवीर सिंग घेणार ब्रेक


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. 'धुरंधर'च्या यशानंतर रणवीर आता दिग्दर्शक जय मेहता यांच्या आगामी 'प्रलय' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असून, त्याचवेळी पत्नी दीपिका पदुकोणसोबत दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठीही सज्ज होत आहे. (Bollywood News)




रणवीर ऑगस्ट २०२६ मध्ये 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. दिवाळीपर्यंत या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर तो नोव्हेंबरच्या सुमारास पितृत्व रजा घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर चित्रपटाचे दुसरे शेड्यूल २०२७ मध्ये सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

'प्रलय' (Pralay) हा झोम्बी थ्रिलर प्रकारातील चित्रपट असून, या शैलीतील रणवीरचा हा पहिलाच चित्रपट असेल. चित्रपटाच्या कथानकाबाबत किंवा इतर कलाकारांबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, चित्रपटाचा मोठा भाग ऑस्ट्रेलियामध्ये चित्रित केला जाणार असल्याची चर्चा आहे. या भूमिकेसाठी रणवीरने शारीरिक आणि मानसिक तयारीलाही सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.



दरम्यान, रणवीर आणि दीपिका (Deepika Padukone) त्यांच्या दुसऱ्या अपत्याच्या स्वागताची तयारी करत आहेत. २०१८ मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याला सप्टेंबर २०२४ मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले होते. 'दुआ' असे मुलीचे नाव असून, तिला त्यांनी आतापर्यंत प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे. (Movie)


यंदाच्या एप्रिलमध्ये दोघांनी सोशल मीडियावर दुसऱ्या बाळाची अपेक्षा असल्याची घोषणा केली होती. दीपिका सध्या गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत असून, बाळाच्या जन्मावेळी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी रणवीर काही काळ चित्रपटांपासून दूर राहणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर