Corporator Sonam Jamsutkar : महापालिकेची धरणे, जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये मुलांच्या सहली आयोजित करा

- भावी पिढीला पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी नगरसेविकेने केली ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत सध्या पाणी टंचाई असून या पाण्याची बचत करण्यासाठी मुंबईकरांवर पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व आता सर्व जनतेला कळावे आणि पाण्याची बचत व्हावी यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे. परंतु पाण्याचे महत्व खऱ्या अर्थान भावी पिढीला कळावे यासाठी महापालिकेच्यावतीने मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत, भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रे आदी ठिकाणी महापालिका व खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात यावी, याची अशी मागणी उबाठाच्या नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी केली आहे. या सहलीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना या मुंबई शहराला जलस्त्रोतातून होणारा शुद्ध पाणीपुरवठा या प्रात्यक्षिकाचे ज्ञान व जलसंवर्धनाबाबतची भावना विकसित होईल,असे त्यांनी म्हटले आहे. (Corporator Sonam Jamsutkar)


नगरसेविका सोनम जामसूतकर (Corporator Sonam Jamsutkar) यांनी महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. या मागणीमध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की,मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई शहरातील जनतेला मुंबईत असलेल्या विहार व तुळशी तसेच मुंबईपासून सुमारे १०० ते १७५ कि. मी. अंतरावर असलेल्या तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा ह्या सात जलस्त्रोतांतून पाण्याचा पुरवठा केला जातो. या तलावातील पाण्यावर पिसे तसेच भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुध्दीकरण केल्यानंतर ते जनतेला विविध जलाशयांच्या माध्यमातून पुरवठा केला जातो. (Corporator Sonam Jamsutkar)



जलशुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक प्रक्रियेद्वारे पाण्याचे शुद्धीकरण करुन विस्तृत जलवाहिनी जाळ्यांद्वारे दररोज ४१०० लिटर्स इतका शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी ही अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून वाढती लोकसंख्या, हवामान बदल व पाण्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. (Corporator Sonam Jamsutkar)



भावी पिढीमध्ये पाण्याचे महत्व, पाणीपुरवठा व्यवस्था, जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि जलस्त्रोतांचे संवर्धन याविषयी प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान निर्माण होण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने 'मुंबई जलदर्शन शैक्षणिक सहल' अंतर्गत महापालिका शाळा तसेच खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नियमित शैक्षणिक सहली आयोजित करणे आवश्यक आहे; त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत, जलशुद्धीकरण केंद्रे व भांडुप संकुल येथे महापालिका व खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात यावी. अशी मागणी सोनम जामसूतकर (Corporator Sonam Jamsutkar) यांनी केली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने