सायबर फ्रॉडला लगाम! WhatsApp घेऊन येतंय भन्नाट सुरक्षा फीचर

व्हॉट्सॲपवर दररोज येणाऱ्या हजारो मेसेजपैकी कोणता मेसेज तुमचा खिशातला पैसा चोरू शकतो, हे ओळखणं आता होणार अगदी सोपं! सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्याला ओळखून, व्हॉट्सॲप आता एक अत्यंत महत्त्वाचं 'स्कॅम अलर्ट' (Scam Alert) फीचर घेऊन येतंय.


?feature=share

हे फीचर खास अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजसाठी डिझाइन करण्यात आलंय. जेव्हा तुम्हाला एखादा संशयास्पद मेसेज येईल, तेव्हा व्हॉट्सॲप स्वतः त्या मेसेजचं विश्लेषण करेल. जर त्यात काही धोक्याचे संकेत (उदा. संशयास्पद लिंक किंवा आमिष) आढळले, तर चॅटमध्ये तुम्हाला 'This may be a scam' असा वॉर्निंग बॅनर दिसेल. यामुळे तुम्ही सावध होऊन ब्लॉक किंवा रिपोर्ट करण्याचा निर्णय त्वरित घेऊ शकाल.


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची प्रायव्हसी! हे संपूर्ण विश्लेषण तुमच्या स्वतःच्या फोनवर (On-device) होणार आहे. मेसेजचे कंटेंट कोणत्याही सर्व्हरवर किंवा कंपनीकडे पाठवले जाणार नाहीत. त्यामुळे तुमचं एंड-टू-एंड एनक्रिप्शन पूर्णपणे सुरक्षित राहील. आणि हो, तुम्ही हे फीचर वापरताय किंवा तुम्हाला अलर्ट मिळाला आहे, हे मेसेज पाठवणाऱ्याला कधीच कळणार नाही.


हे फीचर बाय-डिफॉल्ट बंद असेल, म्हणजे तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन ते मॅन्युअली चालू करू शकता. सध्या हे फीचर बीटा टेस्टिंगच्या टप्प्यावर असून लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होईल.
सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी हे एक खूप चांगलं सुरक्षा कवच ठरणार आहे. माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि या विषयावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा.

Comments
Add Comment

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

TRAI चे मोबाईल कॉलिंग नियम बदलणार; 1 जानेवारी 2027 पासून नवे नियम लागू, ग्राहकांना काय फायदा?

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल कॉलिंग प्रणालीमध्ये बदल केले आहेत. हे नवीन नियम १ जानेवारी २०२७

WhatsApp Update: व्हॉट्सॲपवर आता मेसेज होणार ऑटोमॅटिक! पण शेड्यूल करण्याआधी जाणून घ्या 5 गोष्टी

आता WhatsApp वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यासाठी सतत वेळ पाहण्याची गरज भासणार नाही. कारण WhatsApp ने बहुप्रतीक्षित Scheduled Messages

AI Chatbot: एआय चॅटबॉटचा धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलांशी अश्लील संवाद,ॲपलने अ‍ॅप हटवलं

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याच्या गैरवापराबाबतही गंभीर प्रश्न

AI मुळे 2027 मध्ये कोरोनापेक्षाही मोठं संकट ? संशोधकाचा गंभीर इशारा

AI : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) अनेक कामं सोपी आणि वेगवान झाली आहेत. अवघ्या काही सेकंदांत तासन्तास लागणारी कामं

E85 इंधनावर चालणार टोयोटाची इनोव्हा! भारतातील पहिली फ्लेक्स-फ्यूएल हायब्रीड कार लॉन्च

Toyota Innova Hycross: भारतातील पहिली फ्लेक्स-फ्यूएल हायब्रीड कार टोयोटाने, इनोव्हा हायरायडर लॉन्च केली आहे. ही एमपीव्ही E20