Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील शेतकऱ्यांतर्फे 15 जुलै रोजी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत होणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (Devendra Fadnavis)



विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50 हजार रुपयांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील मर्यादा हटवून त्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्ज घेऊन वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली. (Maharashtra Farmer Loan Waiver)


सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या योजनेनुसार अशा शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. (Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme)



मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, ही सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (BJP Maharashtra)


या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी 15 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने