FIFA World Cup 2026 : एमबाप्पेने रचला इतिहास ! फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये मोडले पाच मोठे विक्रम !

बॉस्टन : फिफा विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात आहे. मागील अनेक स्पर्धांच्या तुलनेत या वर्षीची स्पर्धा ऐतिहासिक ठरली आहे. या विश्वचषकादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण विक्रम मोडले गेले आहेत आणि असंख्य खेळाडूंनी आपल्या कामगिरीने इतिहासात आपले नाव कोरले आहे.



यात फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेने चालू फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ऐतिहासिक आणि विक्रमी कामगिरी करत फुटबॉल जगतातील महान खेळाडूंच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. अवघ्या २७ व्या वर्षी, रिअल माद्रिदच्या या फॉरवर्ड खेळाडूने फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाचे आणि जागतिक फुटबॉलचे अनेक जुने विक्रम मोडीत काढले आहेत. फ्रान्सने मोरोक्कोविरुद्ध मिळवलेल्या २-० अशा दणदणीत विजयानंतर एम्बापेने हा पराक्रम केला.एम्बापेच्या सातत्यपूर्ण गोल करण्याच्या जोरावर फ्रान्सने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत (Semi-finals) प्रवेश केला आहे . या कामगिरीसह त्याने पेले आणि लिओनेल मेस्सी यांच्या सारख्या दिग्गजांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.(Fifa World Cup 2026 )








कीलीयन एमबाप्पेने मोडलेले पाच विक्रम


१.फ्रान्ससाठी सर्वाधिक गोल्स: एम्बापेने फ्रान्ससाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यंदाच्या विश्वचषकात एम्बापेने ऑलिव्हियर जिरूडचा फ्रान्ससाठी सर्वाधिक ५७ गोल्स करण्याचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. सध्या तो ६४ गोल्ससह फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू आहे.(Kylian Mbappe)


२. विश्वचषक बाद फेरीत (Knockout Stage) सर्वाधिक गोल्स: स्वीडनविरुद्धच्या सामन्यात दोन शानदार गोल्स करत एम्बापे विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. बाद फेरीत त्याच्या नावावर आता १२ गोल्स आहेत. त्याने ब्राझीलचे दिग्गज रोनाल्डो नाझारिओ आणि लिओनिडास यांना मागे टाकत बाद फेरीत सर्वात जास्त गोल करण्याचा विक्रम आपल्या नावी केला आहे.


३. सर्वात जलद २० विश्वचषक गोल्स: मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या विश्वतषकाच्या कारकिर्दीतील २० वा गोल करत इतिहासात आपला नाव नोंदवला. अवघ्या २० सामन्यांमध्ये हा टप्पा गाठणारा तो जगातील सर्वात जलद खेळाडू ठरला आहे. सर्वकालीन सर्वाधिक विश्वचषक गोल्सच्या यादीत तो लिओनेल मेस्सीच्या (२१ गोल्स) अगदी जवळ पोहोचला आहे. तर यंदाच्या विश्वचषकातही तो गोल्डन बूट जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.


४. सलग दोन विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी: १९६६ पासूनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सलग दोन वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये (२०२२ आणि २०२६) ११ किंवा त्याहून अधिक गोल्स/असिस्ट (Goal Contributions) नोंदवणारा एम्बापे हा फुटबॉल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे


५. पेनल्टीशिवाय सर्वाधिक गोल्स (Non-Penalty Goals): एमबाप्पेने बॉस्टन येथील सामन्यात गोल करून त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विश्वचषक इतिहासात पेनल्टीशिवाय सर्वाधिक १७ गोल्स करण्याचा विक्रम आता या दोन्ही खेळाडूंच्या नावावर आहे.




फ्रान्ससाठी पुढे काय?


या ऐतिहासिक कामगिरीनंतर फ्रान्स संघ आता उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. Fox Sports च्या विश्लेषकांनुसार, एम्बापे जर पुढील सामन्यात खेळला, तर तो ह्युगो लॉरिसचा विक्रम मोडीत काढून फ्रान्ससाठी सर्वाधिक विश्वचषक सामने (२१ सामने) खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनेल.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त