Nashik : सावळघाटात भीषण अपघात; महिलेसह चार जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

 Nashik : नाशिक–पेठ मार्गावरील सावळघाटात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव ट्रक आणि मारुती इको कार यांच्यात झालेल्या या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता मारुती इको कार (जीजे-१५-सीआर-५६५९) नाशिकहून पेठकडे जात होती. सावळघाटातील तीव्र उतारावर असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे (एमएच-०४-जीएफ-८९०१) ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला ट्रक वेगाने इको कारवर आदळला.



भीषण अपघातात महिलेसह चार जणांचा मृत्यू


या धडकेमुळे इको कार समोरील अवजड ट्रकला (एनएल-०१-एसी-१९२९) जाऊन धडकली. दोन ट्रकांच्या मध्ये कार अडकल्याने तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील एक महिला आणि दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यापैकी एका जणाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या चारवर पोहोचली असून, आणखी एक जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.


अपघाताची माहिती मिळताच पेठ आणि दिंडोरी पोलिस ठाण्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पेठ ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.दरम्यान, अपघातानंतर सावळघाटात दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण