Vegetable Price Hike : पावसाचा फटका! राज्यात भाजीपाल्याचे दर दुप्पट; सर्वसामान्यांच्या खिशाला बसली कात्री

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पावसानंतर मागणी वाढल्याने अनेक भाज्यांचे भाव दुप्पट झाले असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. (Vegetable Price Hike)


जून महिन्यात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने भाजीपाला पिकवला होता. मात्र जुलैच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचून अनेक पिकांचे नुकसान झाले. परिणामी बाजारात पुरवठा कमी झाला आणि दर वाढले. (Maharashtra Vegetable Price)



भाजीपाल्याचे नवे दर (प्रति किलो):



  • फरसबी : ₹१००-१२० वरून ₹१८०-२००

  • वाटाणा : ₹१६०-१८० वरून ₹२२०-२४०

  • शेवग्याच्या शेंगा : ₹६०-८० वरून ₹१००-१६०

  • ढोबळी मिरची : ₹३५-४५ वरून ₹८०-१००

  • गवार : ₹२०-३० वरून ₹८०-१२०

  • आलं : ₹१५०-१८० वरून ₹२००-२८०


दरम्यान, नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून एका जुडीला ₹२१० पर्यंत भाव मिळत आहे. मुंबई, सुरत, अहमदाबादसह इतर शहरांमधून वाढलेल्या मागणीमुळे कोथिंबिरीसह पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. ( Agriculture News)



मेथी, पालक, वांगी, फ्लॉवर, कोबी आणि शेवग्याच्या शेंगांचे दरही दुपटीने वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, पिकांचे झालेले नुकसान आणि मर्यादित पुरवठा यामुळे पुढील १५ दिवस तरी भाजीपाल्याचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी