Jalgaon Crime : जराही दया आली नाही, सासूने अंध महिलेला तिच्या साडेतीन वर्षांच्या अंध मुलासह विहिरीत दिले ढकलून ; कटातही पतीचाही सहभाग असल्याचा आरोप

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात किनगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी पोलिसांना शेतात असलेल्या एका विहिरीत २७ वर्षीय अंध महिला आणि तिचा साडेतीन वर्षीय अंध मुलगा पडल्याची माहिती मिळाली होती. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे तर अंध महिला थोडक्यात बचावली आहे. हा मृत्यू अकस्मात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून या प्रकरणी महिलेचा अंध पती आणि सासूविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात (Yaval Police Station) खून व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Jalgaon Crime News)



नेमके प्रकरण काय ?


किनगाव शिवारातील शेतात असलेल्या एका विहिरीत १३ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास २७ वर्षीय महिला आणि तिचा साडेतीन वर्षीय मुलगा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खोलवर पडल्यामुळे या घटनेत महिला गंभीर जखमी झाली तर तिच्या साडे तीन वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. महिलेवर उपचार सुरु असून प्रकृती गंभीर असल्यामुळे तिने सुरुवातीला कोणताही जबाब दिला नव्हता. त्यामुळे ही घटना अपघाती असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. (Jalgaon Crime News)



सासूने विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप


चिमुरड्याने अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत महिलेची सखोल चौकशी केली. त्यावेळी तिने अतिशय धक्कादायक माहिती दिली. शेतातील विहिरीची पूजा करण्यासाठी गेल्यानंतर सासूने तिला आणि मुलाला मुद्दाम विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप तिने केला. धक्कादायक म्हणजे या कटात पतीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, विहिरीत पडल्यावर तिने आत असलेल्या लाकडी फाउंडेशनचा आधार घेत जीव वाचवला. मात्र, तिचा साडेतीन वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. (Jalgaon Crime News)



पतीही शंभर टक्के दृष्टिहीन


पोलिस तपासानुसार, फिर्यादी महिला ७० टक्के दृष्टिदोष असलेली आहे, आणि तिचा पती शंभर टक्के दृष्टिहीन आहे. मृत मुलगाही जन्मतःच दृष्टिहीन होता. गर्भावस्थेदरम्यान वैद्यकीय तपासणीत होणारे अपत्यही अंध असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर पतीने गर्भपात करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, महिलेने त्यास नकार देऊन मुलाला जन्म दिला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला, आणि हा वाद सातत्याने वाढतच गेला. या कारणामुळेच हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या दृष्टीने तपास सुरू आहे. (Jalgaon Crime News)



महिलेचा पती आणि सासू ताब्यात


या प्रकरणी फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील (२७, रा. किनगाव, यावल) यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात पती स्वप्नील भागवत पाटील (३४) आणि सासू आशाबाई भागवत पाटील (६०) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१), १०९ (१) आणि ३ (५) अंतर्गत खून व खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण