Nashik Crime : पर्यटकांवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांची तात्काळ कारवाई, ९ जण ताब्यात ; त्यादिवशी नेमकं काय घडलं पोलिसांनी सर्वच सांगितलं

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील पर्यटन बिंदू असलेल्या भावली धरण (Bhavali Dam) आणि धबधबा परिसरात एका खलबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर टवाळखोरांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील रहिवासी असलेल्या पुनम भागवत या रविवारी आपल्या कुटुंबातील ८ सदस्यांसह भावली धरणावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. फिरून झाल्यानंतर ये घरी जाण्यासाठी निघाले मात्र दोन टवाळखोरांनी भागवत यांच्या कुटुंबातील एका महिलेची छेड काढली. त्यानंतर ८ ते १० किलोमीटर पुढे त्यांचा थरारक पाठलाग कर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून नऊ आरोपीना ताब्यात घेतले आहे.



त्यादिवशी नेमकं काय घडलं


नाशिकचे एस. पी डी. एस स्वामी यांनी याबाबत सांगितले की,  भावली धरण येथे जी घटना घडली होती, त्याअनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला विनय भंग, गाडीची काच फोडणे,हल्ला करणे, विनय भंग, attempt to murder सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी, नांदगाव सदो, माणिक खांब इतर परिसरात हे आरोपी असून आतापर्यंत 9 आरोपी अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी निष्पन्न झाले असून यामधील 1 आरोपी भोईर नामक याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात कडक कलम लाऊन पर्यटनावर परिणाम होणार नाही अशी कडक कारवाई केली आहे.



आरोपींना मदत करणारेही आरोपीच


पुढे ते म्हणाले, की  त्यादिवशी वादावादी झाली होती तेथून पुढे 7-8 किलोमिटर पुढे झाली होती. वादाचे कारण एक इसमाने शिट्टी वाजवली होती तिथून ते निघून गेले त्यांनंतर हा वाद आणखी पुढे वाढला. महत्वाचे बंदोबस्त आपण वाढवला आहे, अशी घटना घडणार नाही त्यानुसार खबरदारी घेतली जाईल. व्हिडिओच्या माध्यमातून आणि तांत्रिक विश्लेषणातून या आरोपींना ताब्यात घेतले असून अंबड पोलिस स्टेशन येथे पहिले गुन्हा रजिस्टर झाला त्यानंतर हा गुन्हा इगतपुरी स्टेशनकडे वर्ग झाला. सुरुवातीला फक्त बाचाबाची झाली आणि त्या नंतर पुढे 7-8 किलोमीटर हा वाद वाढला. १ आरोपीचा तपास सुरू आहे तर आणखी काही आरोपींची नाव निष्पन्न झाले आहे त्यांचा तपास सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी या आरोपींना मदत केली त्यांना देखील आपण आरोपी करणार आहोत अशी माहिती नाशिकचे एस. पी डी. एस स्वामी यांनी याबाबत माहिती दिली आहे.


दरम्यान घडलेल्या या प्रकाराने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण