Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी


मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी केलेले खुलासे अत्यंत धक्कादायक असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी मांडली. मणी यांच्या दाव्यांमुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला असून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, असेही ते म्हणाले.



मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "मणी यांनी केलेले दावे प्रचंड हादरवून सोडणारे आहेत. या विषयातील काही संशयास्पद बाबी मी स्वतः तत्कालीन विधानसभेत उपस्थित केल्या होत्या. त्या काळात मुंबई हल्ल्याबाबत आधी काय 'इंटेलिजन्स' (गुप्तचर माहिती) मिळाले होते, याचे पुरावे मी विधानसभेच्या पटलावर मांडले होते. आता गृह मंत्रालयातील एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडूनच असे वक्तव्य समोर आल्याने या संशयाला बळकटी मिळत आहे. हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी निगडित असल्याने या संदर्भात योग्य आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे."





केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी नवी दिल्लीत एका मुलाखती दरम्यान २६/११ च्या मुंबई हल्ल्याबाबत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, हा दहशतवादी हल्ला म्हणजे तत्कालीन काँग्रेस सरकार आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय' यांच्यातील एक प्रकारे 'फिक्स मॅच' (पूर्व-नियोजित कट) होता. मणी यांनी दावा केला की, "पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेल्यामुळेच विरोधकांचा 'हिंदू दहशतवाद' हा कथित नॅरेटिव्ह तयार करण्याचा कट अपयशी ठरला. जर कसाब जिवंत पकडला गेला नसता, तर या संपूर्ण जिहादी हल्ल्याचे खापर हिंदू संघटनांवर फोडण्याचा पूर्ण प्रयत्न झाला असता."(News)



काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप


- आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मणी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला. २००६ मध्ये दिग्विजय सिंह यांनी गृह मंत्रालयाकडे 'हिंदू दहशतवादाशी' संबंधित प्रकरणांची माहिती मागितली होती, परंतु तत्कालीन शासकीय अभिलेखात (Record) असा कोणताही उल्लेख किंवा खटला नोंद नव्हता. इतकेच नव्हे तर, २०१० पर्यंत गृह मंत्रालयाच्या अधिकृत दप्तरात 'हिंदू दहशतवाद' असा कोणताही शब्द अस्तित्वात नव्हता, असे मणी यांनी स्पष्ट केले.
- यासोबतच, गुजरात मधील बहुचर्चित 'इशरत जहाँ' चकमक प्रकरणाचा उल्लेख करत मणी यांनी खळबळजनक आरोप केला. या प्रकरणाचा गैरवापर करून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना राजकीय दृष्ट्या लक्ष्य करण्याचा आणि त्यांना अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला होता, असेही मणी यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता