Agriculture News : ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून किमान आधारभूत किमतीअंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) ज्वारी विक्रीची आणखी संधी उपलब्ध झाली आहे. ज्वारी खरेदीस मुदतवाढ मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, संचालक मंडळ व प्रशासनाने राज्य आणि केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतर ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.



राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री जयकुमार रावळ, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पणन महासंघाने केंद्र शासनाकडे याबाबत विशेष विनंती केली होती. केंद्र शासनाने ही विनंती मान्य केली असून, यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. खरेदी प्रक्रिया राबविताना केंद्र शासनाच्या पत्रातील सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी दिली. (Devendra Fadnavis)



यंदा राज्यात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. मात्र, खुल्या बाजारातील ज्वारीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने ज्वारी विक्री करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना शासकीय दराचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातील कमी दरामुळे घाबरून न जाता शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्री करावी. राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी पणन महासंघ कटिबद्ध असल्याचे महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,