FIFA World Cup 2026 : मेस्सीला मागे टाकण्याची सुवर्णसंधी हुकली! स्पेनकडून फ्रान्सचा पराभव, म्बाप्पेचे 'हॅट्ट्रिक फायनल'चे स्वप्नही भंगले

फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन म्बाप्पे याचे सलग तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न स्पेनने उद्ध्वस्त केले. उपांत्य फेरीत स्पेनकडून ०-२ अशा पराभवानंतर फ्रान्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या पराभवासोबतच म्बाप्पेला लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील गोलांचा विक्रम मागे टाकण्याची संधीही गमवावी लागली. (FIFA World Cup 2026)


विश्वचषक २०२६ मध्ये आतापर्यंत लिओनेल मेस्सी आणि किलियन म्बाप्पे या दोघांच्या खात्यात प्रत्येकी ८ गोल आहेत. मात्र, ३ असिस्टच्या जोरावर म्बाप्पे गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आता अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सी इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत गोल करण्यात यशस्वी ठरला, तर तो पुन्हा गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेऊ शकतो. (FIFA World Cup 2026)



याचबरोबर विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मेस्सीला मागे टाकण्याची मोठी संधीही म्बाप्पेकडे होती. मात्र, स्पेनविरुद्धच्या पराभवामुळे त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. आता हा विक्रम करण्यासाठी त्याला २०३० विश्वचषकाची वाट पाहावी लागणार आहे. (FIFA World Cup 2026)



स्पेनविरुद्ध म्बाप्पेचा फिका खेळ :


स्पेनविरुद्धच्या सामन्यात म्बाप्पेचा प्रभाव फारसा दिसला नाही. पहिल्या हाफमध्ये त्याने सर्व फॉरवर्ड खेळाडूंमध्ये सर्वात कमी, केवळ १५ वेळा चेंडूला स्पर्श केला. त्याला मिळालेली सर्वोत्तम संधी ६७व्या मिनिटाला आली, मात्र त्याचा शॉट स्पेनचा बचावपटू मार्क कुकुरेला याला लागून बाहेर गेला. ८६व्या मिनिटाला स्पेनचा गोलरक्षक उनाई सिमॉन याच्याशी धडक झाल्यानंतर म्बाप्पेला पिवळे कार्डही दाखवण्यात आले. या सामन्यात फ्रान्सला एकही प्रभावी पुनरागमन करता आले नाही आणि अखेर स्पेनने अंतिम फेरीत धडक मारली. (FIFA World Cup 2026)



आता लक्ष मेस्सीच्या अर्जेंटिनाकडे :


आता गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत स्पेनशी भिडणार आहे. दुसरीकडे, फ्रान्सला आता तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात पराभूत उपांत्य फेरीतील संघाशी सामना करावा लागणार आहे.


कतार २०२२ विश्वचषकातही म्बाप्पेने ८ गोल करत गोल्डन बूट जिंकला होता. मात्र त्या वेळी अंतिम फेरीत फ्रान्सला मेस्सीच्या अर्जेंटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. तर २०१८ मध्ये रशियात फ्रान्सने विश्वचषक जिंकत म्बाप्पेने जगभरात आपली छाप सोडली होती. मात्र, २०२६ मध्ये त्याची फायनल गाठण्याची आणि मेस्सीला मागे टाकण्याची दोन्ही स्वप्ने अधुरीच राहिली. (FIFA World Cup 2026)

Comments
Add Comment

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या