IND vs ENG 2nd ODI : भारत - इंग्लंड दुसऱ्या ODI आधी आली मोठी अपडेट, कर्णधार बदलण्याची शक्यता ?

वेल्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून विजय मिळवला आहे. अष्टपैलू अक्षर पटेलने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. गुरुवारी (१६ जुलै २०२६) होणाऱ्या सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.(Ind vs Eng)



सामन्याच्या वेळेत बदल


भारत आणि इंग्लंड यांच्यांतील पहिला एकदिवसीय सामना बर्मिंगहॅम येथे भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता खेळवण्यात आला होता. दुसरा एकदिवसीय सामना  इंग्लंडमध्ये दुपारी १२ वाजता, तर भारतीय वेळेनुसार ५ :३० सुरू होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे खेळला जाणार आहे. जर सामना पूर्ण ५० षटकं खेळवण्यात आला तर रात्री १ वाजता संपण्याची शक्यता आहे.



कर्णधार बदलण्याची शक्यता ?


भारतीय संघाच्या कर्णधारपदात बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार शुभमन गिल पहिल्या सामन्यात जखमी झाला होता. पहिल्या सामन्यात ८० धावा केल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला होता. जर तो आगामी सामन्यात सहभागी झाला नाही, तर त्याच्या जागी श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला