Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा मार्ग वाहनचालक आणि प्रवाशांसाठी मोठ्या गैरसोयीचा ठरत आहे. रस्त्यावर साचणारे पाणी, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, खराब झालेला सर्व्हिस रोड आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका वाढल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.(Vadkhal Bypass)



महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही टोलवसुली सुरू करण्यात आल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध न देता टोल आकारणी करणे अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. महामार्गाचे उर्वरित काम, सर्व्हिस रोडची दुरुस्ती आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारल्यानंतरच टोलवसुली सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



दरवर्षी पावसाळ्यात वडखळ बायपासवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत खराब झाल्याने स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार आणि अन्य वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.या प्रश्नाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व्हिस रोडची दुरुस्ती, जलनिस्सारण व्यवस्था आणि दिशादर्शक फलकांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. कामातील त्रुटींसाठी जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशीही मागणी पुढे आली आहे.(Mumbai-GOA)

Comments
Add Comment

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.