Sangamner Crime News : संतापजनक ! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपीवर 'पोक्सो'सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

Sangamner Crime News : संगमनेर तालुक्यातील एका गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गणेश चंद्रभान गायकवाड (वय २८, रा. खांडगाव, संगमनेर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खांडगाव आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.



नेमकं काय घडलं ?


शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय फिर्यादी महिला ही तिच्या १५ वर्षीय पीडित मुलगी आणि मुलासह तालुक्यातील एका गावात राहते. ती मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. आरोपी गणेश गायकवाड हा फिर्यादीच्या मावस भावासोबत काम करत असल्याने, त्याचे गेल्या १५ वर्षांपासून पीडितेच्या घरी येणे-जाणे होते. या जुन्या ओळखीचा गैरफायदा आरोपीने घेतला. दिनांक १४ जुलै २०२६ रोजी रात्री फिर्यादी महिला, तिची मुलगी आणि मुलगा नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. १५ जुलै रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेला अचानक जाग आली. तेव्हा शेजारी झोपलेली पीडित मुलगी जागेवर दिसली नाही. फिर्यादीने तात्काळ हातामध्ये बॅटरी (टॉर्च) घेऊन घराबाहेर शोध सुरू केला. (Sangamner Crime News)



...तर मी मारून टाकीन


घराच्या पाठीमागील शेतातून मुलीचा आवाज आल्याने फिर्यादीने तिकडे बॅटरीचा प्रकाश टाकला. त्यावेळी आरोपी गणेश गायकवाड आणि पीडित मुलगी हे दोघे संशयास्पद स्थितीत आढळून आले. फिर्यादीने मुलीला जवळ बोलावले असता, आरोपी गणेश गायकवाड याने तिला धमकावले. "तुझ्या आईकडे जाऊ नको, नाहीतर कोण काय करतंय ते मी बघतो आणि एखाद्याला मी मारून टाकीन," अशी धमकी आरोपीने दिली. फिर्यादी महिला फोन आणण्यासाठी घरात गेली असता, आरोपीने तिथून पळ काढला. त्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. (Sangamner Crime News)



संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा


आरोपीने रात्री ३ वाजता खिडकीजवळ येऊन तिला बाहेर बोलावले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे तिने सांगितले. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या लेखी तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ कलम ६४, कलम ३५१(२), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोस्को) अधिनियम, २०१२ कलम ४, ६, ८ आणि १२ कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करत आहेत

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

Thane Fire News : ठाणे हादरले! दिवा-शिल रोडवरील व्यावसायिक संकुलात भीषण आग; चार गोदामे जळून खाक, मोठी जीवितहानी टळली

ठाणे : ठाण्यातील दिवा-शिल रोड परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि खळबळजनक आगीची घटना घडली. एका

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून