Shevgaon News : कोट्यवधी खर्चूनही १० वर्षांपासून रखडला शेवगावचा सांडपाणी प्रकल्प; गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

शेवगाव : नगरपरिषदेमार्फत सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, दशक उलटूनही प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पात आर्थिक अनियमितता आणि संभाव्य भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. (Shevgaon)



या प्रकल्पासाठी एका शेतकरी महिलेने काही अटींवर शहरालगतची स्वतःची जमीन नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने संबंधितांमध्ये नाराजी आहे. या प्रश्नाकडे यापूर्वीही वृत्तपत्रांतून लक्ष वेधण्यात आले होते. (Farmers News)


याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा दिशा समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाचा दर्जा, झालेला खर्च आणि प्रकल्पाची उपयुक्तता यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ( Ahilyanagar News)



चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, दोषींना निलंबित करावे, संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच शासनाची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. ( Sewage Treatment Plant)


जिल्ह्यात अलीकडे विविध विकासकामांतील गैरव्यवहारांवर कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातही निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी