Anna Bansode : अजितसृष्टीसाठी पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबवा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबविण्यात यावी. मात्र, या जागेवरील रहिवाशांचे पुनर्वसन पूर्णपणे न्याय्य, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.



आज विधान भवन येथील उपाध्यक्षांच्या दालनात यासंदर्भात बैठक पार पडली. बैठकीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ३०१ चिंचवड येथील पर्यटन केंद्रासाठी आरक्षित भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या ‘अजितसृष्टी’ प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.


या भूखंडावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे योग्य ठिकाणी व योग्य वेळेत पुनर्वसन करण्याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत संबंधित जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असून, परिसर निवासी स्वरूपाचा आहे. कामगारांसाठी घरे या योजनेअंतर्गत शाहूनगर परिसरात पुनर्वसनाची प्राथमिक तयारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दर्शविल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, पुनर्वसनाची प्रक्रिया लोकाभिमुख, सुसूत्र आणि सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन राबवावी. प्रत्येक पात्र रहिवाशाला नियमानुसार पर्यायी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतरच ‘अजितसृष्टी’ प्रकल्पाच्या पुढील कामांना गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.


या बैठकीस एमआयडीसी व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते. बैठकीत पुनर्वसन आणि प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Comments
Add Comment

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन, 31 फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन; पाहा खास क्षण

[caption id="attachment_1066607" align="aligncenter" width="800"] त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन